यवतमाळ

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकातील हे काळे कायदे शेतकऱ्यांना भिकेस लावणारे -लोकनायक प्रकाशभाऊ पोहरे

 

घाटंजी :- दि 3 मार्च पासून मातृतिर्थ सिंदखेड राजा ते अकोला पर्यंत किसान ब्रिगेड च्या वतीने किसान ब्रिगेड सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात ही रॅली दि. ८ मार्च रोजी दाखल होऊन आर्णी येथून येत असताना प्रथम गाव भांबोरा येथे या रॅलीचे स्वागत करण्यात आले यावेळी महिला दिनाच्या औचित्याने आदरणीय प्रकाश भाऊ पोहरे यांनी शेतकरी विधवा मातेला साडी-चोळी व पुष्पगुच्छ देऊन सांत्वन केलं त्यानंतर तळणी येथे सभेचे आयोजन करण्यात आले तसेच घाटंजी तालुक्यातील डांगरगाव पांढुर्णा येथे सुद्धा सभा घेण्यात आल्या तर तालुक्यातील प्रत्येक गावात रॅलीचे स्वागत करण्यात आले शेवटी रॅलीचा मुक्काम घाटंजी येथे झाला आणि आज दि 9 रोजी यवतमाळ व कळंब तालुक्यातील काही गावांतुन मार्गक्रमण करीत राळेगाव येथे मुक्कामी पोहोचले आहे

किसन ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश काकडे ऍड सतीशचंद्र रोठे सुभेदार मेजर शेषराव मुरोडिया उत्तर प्रदेशचे रामदास मानव हे रॅलीचे प्रमुख असून मोठ्या प्रमाणात सायकल स्वारसह ही रॅली मार्गक्रमण करीत आहे किसान ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रकाश भाऊ पोहरे यांनी या रॅलीदरम्यान केंद्र सरकारने केलेल्या शेतकऱ्यांकरिता केलेल्या शेतकरी विधेयकाच्या या कायद्याच्या विरोधात प्रत्येक ठिकाणी हा कायदा शेतकऱ्यांना कसा भीकेस लावणार आहे हे समजावून सांगत होते त्यात मुक्त बाजारपेठ शेतकऱ्यांना कशी बाधक ठरू शकते व ती कंपन्यांना कशी फायद्याची ठरू शकते याबाबत सांगत होते तर बाजार समितीच्या खाजगी करणाने शेतकऱ्यांची कशी लूट केली जाणार आहे करार शेती बाबत शेतकऱ्यांच्या हातून शेती कशी हिसकावून घेण्याची शक्यता आहे अशा अनेक या शेतकरी कायद्यातील त्रुटी शेतकऱ्यांना ते सांगत होते गेल्या शंभर दिवसापासून दिल्लीच्या सीमेवर बसून असलेले सात राज्यातील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याच्या दृष्टिकोनातून हा नऊशे किलोमीटरचा प्रवास करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या कायद्याच्या संदर्भात जागरूक करण्याच्या दृष्टीने प्रत्येक सभेत आपले प्रखर मत मांडत होते सोबतच ज्या पद्धतीने सोन्याच्या भावात वाढ झाली त्या पद्धतीने शेतकऱ्याचा शेतमालाच्या भावात वाढ झाली नसून लोखंड सिमेंट कर्मचाऱ्यांचा पगार सर्व गोष्टी वाढल्या मात्र शेतकऱ्यांच्या मालाचा भाव मात्र त्या पटीत वाढला नसल्याने शेतकरी इथे नागवला जात असल्याचे परखड मत ते प्रत्येक सभेत मांडत होते काँग्रेस सरकार विविध घोटाळ्यांचे आरोप करत आणि अच्छे दिन असे स्वप्न दाखवून भाजप हे सत्तेत आले मात्र काँग्रेस सरकार पेक्षा अधिक जुलमी सरकार भाजप सरकार असल्याचे मत सुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी मांडले मोदी ने दिलेले प्रत्येक आश्वासन हे फोल ठरले असून कोरोना हे एक राष्ट्रीय षडयंत्र निर्माण करून सामान्यांना घरात डांबून ठेवून आपल्या अजेंड्यावरील लक्ष यानिमित्ताने विचलित करून आपला अजेंडा पूर्ण करण्याचा डाव केंद्र सरकारने रचला आहे वास्तविक पाहता लॉक डाऊन ची परिस्थिती नसतानाही देशभरात लॉक डाऊन लावण्यात आले आहे तेव्हा लॉक डाऊन मध्ये झालेल्या शेतकरी व्यापारी लघु व्यवसायिक अश्या समस्त घटकांचे नुकसान भरपाई या सरकारने द्यावे असे परखड मत व्यक्त केले मास्क लावून आजारी पाडण्याचे हे षडयंत्र असून अपघातासारख्या बाबींपेक्षा कोरोनाचा मृत्यू चा दर हा कमीत असल्याचे यावेळी ते म्हटले कोरोना हा विषाणूजन्य रोग असून मास्क लावणे हा त्यावरील पर्याय नाही असे अनेक मुद्द्यावर आपले परखड मत शेतकऱ्यांच्या समोर व्यापाऱ्यांच्या समोर समस्त सामान्य जनतेच्या समोर मांडते आपली किसान ब्रिगेडची सायकल रॅली कडाक्याच्या उन्हाळ्यातही मार्गक्रमण करीत आहे

यावेळी सदर सायकल रॅली मध्ये किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश काकडे ऍड सचिनचंद्र रोठे सुभेदार मेजर शेषराव मुरोडीया उत्तर प्रदेशचे रामदास मानव अकरा वर्षाचा एक बालक सोबतच अनेक सायकलस्वार या रॅलीत सहभागी झाले असून सदर रॅलीला प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.

——————–

Copyright ©