यवतमाळ

सावधान कोरोणाचा पुन्हा उद्रेक

 

जिल्ह्यात पाच मृत्युसह 429 जण पॉझेटिव्ह

282 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 10 : गत 24 तासात जिल्ह्यात पाच मृत्युसह 429 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 282 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 28, 71 आणि 78 वर्षीय पुरुष, तसेच पुसद येथील 43 आणि 57 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या 429 जणांमध्ये 246 पुरुष आणि 183 महिला आहेत. यात यवतमाळातील 133, दिग्रस 110, बाभूळगाव 71, पांढरकवडा 28, पुसद 24, दारव्हा 20, महागाव 15, अर्णी 8, नेर 8, कळंब 5, घाटंजी 2, वणी 2, उमरखेड़ 1 आणि 2 इतर शहरातील रुग्ण आहेत.

बुधवारी एकूण 1865 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 429 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1436 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2072 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 20172 झाली आहे. 24 तासात 282 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 17611 आहे. तर जिल्ह्यात एकूण 489 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 176891 नमुने पाठविले असून यापैकी 175792 प्राप्त तर 1699अप्राप्त आहेत. तसेच 155020 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

 

Copyright ©