यवतमाळ

स्व.पी. एल. सिरसाट प्रणित ग्रामिण पत्रकार संघटनेची कार्यकारणी जाहिर

मुळावा दि ०८ स्व.पी.एल.शिरसाट प्रणित, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना, शाखा गौळ-मुलावा-पोफाळी
च्या अध्यक्षपदी देशोन्नतीचे पत्रकार यशवंत जाधव (गौळ),यांची तर उपाध्यक्षपदी सकाळचे आनंद सुरोशे (मुळावा), सचिव सुधाकर जाधव (पोफाळी), कार्याध्यक्ष लोकमतच्या सविता घुगरे (पोफाळी) सहसचिव धम्मदीप कांबळे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. दिनांक 7 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता महादेव देवस्थान गंगनमाळ फाटा येथे गौळ, मुळावा, पोफाळी सर्कलमधील सर्व ग्रामीण पत्रकारांची मिटिंग आयोजित करण्यात आली होती त्यात वरीलप्रमाणे कार्यकारिणी ठरवून घोषित करण्यात आली. या कार्यकरिणीमध्ये शिवाजी मस्के, दिनेश चोतमल, हरिदास इंगोलकर, प्रदीप बारहाटे, संतोष कलाने, बाबा खान, सुनील ठाकरे, संजय देशमुख, शेख नयूम, गजानन पवार, संदेश कांबळे ,प्रशांत देशमुख, आशिष काटकाडे, पंकज गोरे,अर्चना भोपळे, सुलोचना देशमुख, मनोज जयस्वाल, संदेश कांबळे, भागवत काळे शे. मुद्दशीर यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

Copyright ©