विदर्भ

कोरोना संक्रमणात माठ विक्री व्यवसायावर परिणाम–भाव वाढले विक्री घटली.

उन्हाळ्याची चाहूल लागली की दरवर्षी शहरात माठ विक्रीला येत असतात.गरिबांचा फ्रीज अशी उपमा मिळालेला माठ व रांजण विक्रेते मात्र यावेळेस कोरोना संकटामुळे चिंतेत सापडले आहे.कोरोना संक्रमण संकटकाळात माठ विक्री व्यवसायावर देखील मोठा परिणाम जाणवत आहे. दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात होणारी लग्नसराई, विविध धार्मिक उत्सव, घरगुती वापर, लोकांना पिण्यासाठी ठंडगार पाणी मिळावे करीता शहरात ठिकठिकाणी सामाजिक भावनेने पाणेरी लावल्या जातात. मागील वर्षापासून यावर बंधने आलेली आहेत. लग्न,सण,उत्सव यासाठी  मोठ्या प्रमाणात माठ आणि रांजण तसेच धार्मिक उत्सवाकरीता देव कुंड्या, घागरी यांची विक्री होत असते. परंतु यावर्षी कोरोना संक्रमणाचे संकट असल्याने माठ विक्री व्यवसायावर परिणाम झालेला जाणवत आहे. यावर्षी माठ, रांजण यांचे भाव वाढले असले तरी विक्रीत मात्र घट आलेली आहे. मागील वर्षी एकशे दहा ते एकशेवीस रुपयाला मिळणारा माठ यावर्षी १५० ते १८० रुपये पर्यंत गेलेला आहे. रांजणाच्या किमती देखील वाढलेल्या आहेत. माठातील व रांजनातील पाणी हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम असून त्याला कशाचीही सर येणार नाही.लखलखत्या उन्हात,गरमीच्या झळांं मध्ये माठातील थंडगार पाणी पिल्याने मन तृप्त होते.शहरात दरवर्षी बोरीअरब येथील माठ प्रसिद्ध असून मोठ्या प्रमाणात बुटीबोरी येथील माठ विक्रीसाठी येतात पण यावर्षी दोनच लोकांनी माठ विक्रीसाठी आणले असून या व्यवसायावर देखील परिणाम जाणवत आहे.

———————————–———————– यावर्षी मालाचे भाव वाढलेले असल्याने माठ व रांजण यांचे भाव देखील वाढले आहेत.कोरोना संक्रमण असल्याने मागील वर्षी पासुन माठ व रांजण विक्री व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. यावर्षी लग्नसराई नसल्यामुळे माठ,घागरी, देव कुंड्या,रांजण यांची विक्री कमी झाली आहे. मी पाच सहा वर्षापासून व्यवसाय करीत आहे परंतु अशी वेळ पाहिली नाही.

रामभाऊ मेहरे (माठ विक्रेते) मुर्तिजापूर.

———————————————————- यावर्षी लग्नसराई नसल्यामुळे रांजण आणि माठ तसेच देवकुंडीच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. कोरोना संकट असल्याने कच्च्या मालाच्या किमतीत वाढ तसेच मालवाहतूक दर वाढल्यामुळे मालाचे भाव वाढले असून विक्रीत मात्र घट झाली आहे.

–सुभाष गुडापे (माठ विक्रेते बोरीअरब)–

Copyright ©