Breaking News विदर्भ

सुपरफास्ट गीतांजली एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला

 

गीतांजली हावडा-मुंबई एक्सप्रेसचा एक डब्बा रुळावरून खाली उतरला 

 

सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप

हावडा– मुंबई सुपरफास्ट गीतांजली एक्सप्रेस मूर्तिजापुर रेल्वे स्थानकावरून पूढे निघाल्यावर काही वेळाच्या अंतराने काटेपूर्णा बोरगाव दरम्यान असलेल्या पैलपाडा रेल्वे फाटक क्र.४७ जवळ गोलाई वर वळण घेत असताना या एक्सप्रेसचा शेवटचा डबा रूळावरून घसरला.  गाडी वळणावर असल्याने गाडीचा वेग मंदावलेला होता म्हणून मोठ्या प्रमाणात डबे रुळावरून खाली घसरले नसल्याचे म्हटल्या जात होते.जर गीतांजलीचे जास्त डबे रुळावरून खाली घसरले असते आणि बाजूच्या लाईन वरून जर दुसरी गाडी असती तर तर मोठा अनर्थ घडला असता अशी भिती व्यक्त करण्यात येत होती.डबा रुळावरुन घसरल्या नंतर जवळपास एक किलोमीटरपर्यंत जाऊन गाडी थांबल्याचे समजले.सदर अपघात घडल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.

बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील काटेपूर्णा ते बोरगाव मंजू रेल्वे स्टेशन दरम्यान असलेल्या  पैलपाडा रेल्वे फाटक क्र. ४७ जवळ आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास गीतांजली हावडा-मुंबई एक्सप्रेस अप लाईन वरुन मार्गस्थ होत असताना शेवटचा डब्बा अचानक वळणावर गाडीचा वेेग मंदावला असता रुळांवरून घसरल्याने मोठा आवाज झाला. सदर आवाज दूरपर्यंत ऐकू गेल्याचेही समजले .त्यामुळे प्रवासी घाबरले होते. जवळपास एक किलोमीटर अंतरावर जाऊन गाडी थांबल्यानंतर सदर बाब लक्षात आली. जास्त डबे जर रुळावरून खाली उतरले असते तर मोठा अपघात घडण्याची शक्यता वर्तवली जात होती. सुदैवाने या अपघातात प्रवाशांनाा कुठलीही इजा झाली नाही.सर्व प्रवासी सुखरूप होते.नागपूर कडून मुंबईकडे जात असलेली हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस क्र.०२२६ अप बाजूने काटेपूर्णा रेल्वे ओलांडल्यानंतर पैलपाडा गावाजवळील रेल्वे फाटक क्र. ४७ जवळ आल्यानंतर मागील डब्बा अचानक घसरला. सुदैवाने सदर डब्बा हा प्रवाशांकरिता आरक्षीत नसल्याकारणाने यामध्ये कुठलीही मोठी दुर्घटना झाली नाही. तसेच प्रवाशांंना देखील दुखापत झाली नाही.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत, बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके, मुर्तिजापूर पोलीस,रेल्वे सुरक्षा बलाचे ठाणेदार हरणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले व त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.दरम्यान हावडा-मुंबई गीतांजलि एक्सप्रेस क्रमांक ०२२६ अप  गाडीचा घसरलेेला एक डब्बा सोडून रेल्वे मुंबई कडे १ वाजताच्या सुमारास मार्गस्थ करण्यात आली. दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.दरम्यान या मार्गावरील रेल्वे सेवा प्रभावित झाल्याने रेल्वे सेवा उशीराने सुरू होणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे. अपघात ग्रस्त झालेला डबा रुळावर आणून बोरगाव रेल्वे स्टेशन कडे ४ वाजताच्या सुमारास रवाना करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली.गितांजली एक्सप्रेस मध्ये सुविधांचा अभाव असल्याचे प्रवासी वर्गाकडून सांगण्यात येत होते.गाडीमधील काही डब्या मधील लाइट व पंखे बंद असल्याचे प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याबाबत प्रतिक्रीया प्रवासी वर्गातून उमटल्या.आज डाऊन लाइन वरून रेल्वे वाहतूक सुरू राहणार असूूूूून क्षती ग्रस्त झालेला अप रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून आज रात्रभर हे काम सुरू राहणार असून उद्या सदर अप लाईन दुरुस्त करून पूर्ववत सुरू होणार असल्याचे समजले.

——————————————————–

काटेपूर्णा येथील चंडिका माता युवा मंडळ तसेच छत्रपती शिवाजी महाराज आपत्कालीन पथक यांनी प्रवाशांना पाणी व बिस्किटाची व्यवस्था केली होती.

Copyright ©