यवतमाळ

महाशिवरात्र महोत्सव” निमित्त

महाशिवरात्र महोत्सव”

शिवतत्वास साक्षी होण्याची आणि कैलासाच्या दैवी उर्जेला अनुभवण्याची एक सुवर्ण संधी!
महाशिवरात्र हा भारतातील एक अत्यंत महत्वाचा उत्सव आहे. हा उत्सव त्याची लांबी, रुंदीच्या कक्षा ओलांडून म्हणजेच सर्वत्र व्यापकपणे साजरा केला जातो.रात्रभर चालणाऱ्या या उत्सवामध्ये साधक संपूर्ण रात्र शिवाच्या दैवी आणि आध्यात्मिक शक्तीचा अनुभव घेत जागरण करतात.
गुरुतत्त्व व्यसपीठामार्फत वार्षिक महाशिवरात्र महोत्सव गुरुवार, दिनांक ११ मार्च २०२१ रोजी आयोजित केला आहे. या पावन दिवशी परमपूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजी गहन ध्यान अनुष्ठानातून बाहेर येऊन सर्व साधकांना मार्गदर्शन करतील.हा उत्सव गुजरात राज्यातील दांडी समर्पण आश्रम येथे साजरा केला जाईल.याचे थेट प्रक्षेपण गुरुतत्त्व यूट्यूब च्या चॅनलवर सकाळी ५:३० वाजल्यापासून करण्यात येईल. या कार्यक्रमाची सुरुवात मौन ध्यानाने होईल, त्यानंतर स्वामीजी मार्गदर्शन करतील. शेवटी पादुका नमनचा कार्यक्रम होईल.
महाशिवरात्री उत्सवा संबंधित सर्व माहिती गुरुतत्त्व (Gurutattva) फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर नियमितपणे पोस्ट केली जाईल .
परमपूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजी हे एक आत्मसाक्षात्कारी योगी आहेत .स्वामीजी बालपणापासूनच, परम सत्याच्या शोधत होते. त्यांनी आयुष्यातील १६ वर्षे हिमालयात वेगवेगळ्या सिद्ध गुरूंच्या सानिध्यात साधना करून गुरूंकडून मिळालेले ज्ञान आत्मसात केले. १९९४ साली त्यांनी समर्पण ध्यान योगाची स्थापना केली.तेव्हापासून स्वामीजी त्यांना प्राप्त झालेले,८०० वर्षे जुने आत्मज्ञान, संपूर्ण विश्वात निःशुल्क वाटत आहेत.
‘गुरुतत्त्व’ हे एक जागतिक स्तरावरील व्यासपीठ आहे.जे संपूर्ण मनुष्यजातीच्या विकासासाठी कार्यान्वित आहे. हिमालयीन योगी परमपूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजींच्या निदर्शनामध्ये महाशिवरात्रीचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण विश्वाला शिवतत्त्व व कैलासाच्या दिव्य ऊर्जेची अनुभूती महाशिवरात्रीला प्राप्त होऊ शकते.
तुम्हा सर्वांना या आध्यात्मिक उत्सवास आमंत्रित करत आहोत.अधिक माहितीसाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील @Gurutattvaला लाईक आणि फॉलो करा. महाशिवरात्रीच्या महोत्सवाचे रिमाइंडर मिळवण्यासाठी YouTube.com/Gurutattva चॅनलला सब्सक्राइब करा आणि घंटीचे चिन्ह दाबा.

“आत्मानंदाच्या ह्या ऑनलाईन उत्सवामध्ये आपले

Copyright ©