यवतमाळ

बुलेटचे फटाके फोडणाऱ्यावर निर्बंध कोण लावणार आर,टी,ओ की पोलीस प्रशासन?

 

बुलेट दुचाकी वाहनांचे मूळ सायलेन्सर बदलून फटाके फोडणारे व मोठा आवाज करणारे सायलेन्सर लावून शहरात धुमाकूळ

सध्या दिग्रस शहरात बुलेटचे प्रमाण भरपूर वाढले असून यात 25 टक्के बुलेट मध्ये फटाके फोडणारे सायलेन्सर बसविण्यात आले आहे या तर इग्निशन ऑन ऑफ करून फटाके फोडल्या जात असल्याने  शहरातील नागरिक त्रस्त झाले आहे. मात्र या फटाके फोड बुलेट बहाद्दूरांवर कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाही. या संधीचा फायदा घेत फटाके फोड बुलेट बहादुर सुसाट वेगाने पोलीस स्टेशन समोरून फटाके फोडत रस्त्यावर दिसून येत आहेत.भरधाव वेगाने बुलेट चालवून बुलेटच्या सायलेन्सरद्वारे फटाके फोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई होणार का. या कडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे

———– ———— ————-
फटाके फोडणाऱ्या वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई करून बुलेट ला लावलेले (डुप्लिकेट) फटाके फोडणारे सायलेन्सर काडून जप्त करून मूळ सायलेन्सर लावण्यास सक्ती करू
पोलीस निरीक्षक
सोनाजी आम्ले

Copyright ©