यवतमाळ शैक्षणिक

श्री नारायणराव माकडे विद्यालयात जागतिक महिला दिन

मुख्याध्यापिकेने केले महाराष्ट्र शासनाचे कौतुक
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महाराष्ट्र शासनाचे स्वागतार्ह पाऊल

जागतिक महिला दिनी महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय अभिनंदनीय

सातबारावर कारभारणी चे नाव अनिवार्य करून पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा कायम केली सौ साक्षी बनारसे मुख्याध्यापिका श्री नारायणराव माकडे हायस्कूल यवतमाळ.

 

स्था.का.यवतमाळ, दिनांक ८ मार्च रोजी
श्री. संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, यवतमाळ द्वारा संचालित श्री. नारायणराव माकडे हायस्कूल व स्व. रामभाऊजी ढोले विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, यवतमाळ. येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मुख्याध्यापिका सौ. साक्षी किशोर बनारसे यांनी भूषविले. मंचावर जेष्ठ शिक्षक रुपेश लोखंडे उपस्थित होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व भारत रत्न स्व. इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन हार अर्पण व दिपप्रज्वलना नंतर मुख्याध्यापिका सौ. साक्षी किशोर बनारसे यांनी महिलांनी स्वबळावर निर्णय घ्यावा. असा संदेश दिला. आजही भारतीय समाजात स्त्रीला दुय्यम स्थान दिलं जातं हे दुर्दैव आहे. स्त्री स्वतंत्र निर्णय घेण्यास सक्षम आहे.आणि आजपासून तर महाराष्ट्र सरकार द्वारा सातबारावरील कारभारीनी चे नाव सक्तीचे करून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले पाऊल खरोखरच अभिनंदनीय आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड तथा शिक्षण सचिव वंदना कृष्णा दोन्ही शिक्षण क्षेत्राकरिता लाभलेल्या खंबीर महिला असून त्या निश्चितच महिलाचे समाजातील स्थान भक्कम करण्यास मदत करेल. असे उद्गार काढले.
प्रास्ताविकात श्याम जतकर सरांनी महिला समाजासाठी का महत्वाच्या ते सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख कु. कांचन मून यांनी तर आभार प्रदर्शन सौ. ज्योत्स्ना कन्नाके यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विलास गुल्हाने, अनिल गुल्हाने, बाबाराव मरसकोल्हे, अंकुश जिरापुरे परिश्रम घेतले .

 

Copyright ©