विदर्भ सामाजिक

मूर्तिजापुरात पुन्हा साडेतीन लाखाचा अवैध गुटखा जप्त विशेष पथकाची कारवाई.

 

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने मूर्तिजापूर येथे आज पुन्हा धाड टाकून अवैघ गुटका जप्त केल्याची कारवाई आज दि.०८/०३/२०२१ रोजी सकाळी ११.४० वाजताच्या सुमारास केली.सदर कारवाई ११. ४० वाजताच्या सुमारास झाली असली तरी या बाबतची माहिती मिळण्यास तब्बल रात्रीचे आठ वाजले.यापूर्वी देखील शहरातील अवैध गुटका गुटका माफियांकडून जप्त करण्यात आल्याची कारवाई करण्यात आलेली आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधरन यांच्या विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीवरून येथील एम.आय.डी.सी. परिसरात अवैद्य गुटखा जप्त केला.सदर जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किमत ३ लाख ५३ हजार ४०० रुपये  असल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे. याबाबत आरोपी विरुद्ध कलम १८८,२७२,२७३ भादंवी नुसार  तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम २६(२)(१)(५),२७(३)बीई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार यादव हे करीत आहेत. सदर पथकाने कारवाई ११.४० वाजताच्या सुमारास केली असली तरी माहिती मात्र रात्री आठ वाजताच्या सुमारास मिळाली हे विशेष. एवढा विलंब का लागला ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

Copyright ©