महाराष्ट्र

तनुजा लेले हीची फिट नेस ट्रेनर म्हणून निवड

– विलेपारले येथील, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती (रजि.) संचालीत प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाची फिटनेस ट्रेनर, तनुजा लेले, हिची भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्या मध्ये लखनऊ येथे ७ ते २४ मार्च या दरम्यान होणाऱ्या पांच एक दिवशीय व तीन २०-२० मालिकांसाठी महिलांची प्रशिक्षिका म्हणुन निवड झाली आहे. कु. तनुजा लेले ही २०१९ पासून स्ट्रेन्थ आणि कंडिशनिंग कोच म्हणून प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात कामकाज पहात आहे. तनुजा लेले हिच्या निवडीमुळे क्रीडा क्षेत्रांत, सिंधुदुर्गात व महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रबोनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू, सचिव डॉ. मोहन अ. राणे, कार्यकारी अधिकारी प्रितम केसकर, जेष्ठ पत्रकार नारायण सावंत यांच्यासह संपूर्ण प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या वतीने तिला शुभेच्छा देण्यात आल्या. प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाची निर्मिती मुंबईचे माजी महापौर माजी आमदार डॉ. रमेश यशवंत प्रभू यांनी केली आहे. मणचे मुटाट ता. देवगड जि. सिंधुदूर्ग येथील ग्रामस्थ व जनता सह. बॅंक मुंबईचे सेवानिवृत्त अधिकारी प्रदिप शिवराम लेले व जे.जे. रुग्णालय मुंबईच्या नामवंत लेक्चरल डाॅ. सौ. पल्लवी प्रदिप लेले यांची कन्या कु. तनुजा लेले हिचे शिक्षण रुपालेल काॅलेज मुंबई येथे २०१२ मध्ये पुर्ण झाले. कु. तनुजा ही, महाराष्ट्राचे पाच वेळ निवडुन आलेले माजी आमदार कै. आप्पा गोगटे यांच्या भाच्याची मुलगी म्हणजे भाचेनात आहे. न्युझीलंड मध्ये सन २०१३ – २०१४ डिप्लोमा स्पोर्ट थेरपी डिग्री घेतली. तर पुढील शिक्षण आयर्लंड येथे आॅनलाईन सुरु आहे. क्रीड़ा संकुलात चालत असलेल्या, अरविंद प्रभूंच्या “ प्ले फ़ोर परफेक्शन “ या ऑलम्पिक प्रोजेक्ट मधिल निवड़क ६ खेळांपैकी जिम्नॅस्टिक्स या खेळासाठी हरीश परब (जिम्नॅस्टिक्स प्रमुख प्रशिक्षक) यांच्या सोबत गेली ३ वर्ष कार्यरत आहे. तनुजाच्या अनुभवाचा क्रीड़ा संकुलातील खेळाडूंना खूप फ़ायदा झाला आहे. सुमारे ७ ते ८ महिने चाललेल्या लॉकडाऊन मध्ये ही तनुजाने ऑनलाइन फ़िट्नेस सेशन घेतल्याने जिम्नॅस्टिक्स खेलाडूंना त्याचा फ़ारच फ़ायदा झाला आहे. असे जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक हरीश परब आवर्जुन सांगतात. २६ फेब्रुवारी रोजी तनुजा लखनौव येथे प्रशिक्षण देण्यासाठी कोरोणाच्या सर्व टेस्ट करुन काळजी पुर्वक हजर झाली आहे.

तिच्या पूढच्या वाटचालीस सर्व स्तरातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Featured

Copyright ©