यवतमाळ

किसान ब्रिगेडची सायकल रॅली घाटंजीत दाखल होणार

 

रूट मधील प्रत्येक गावात सभा व स्वागत

घाटंजी :-  दिल्ली येथील शेतकऱ्यांना शंभर दिवस पूर्ण होऊनही अजून पर्यंत शासनाने कोणतेच ठोस पाऊल न उचलल्याने किसान ब्रिगेड च्या वतीने सिंदखेडराजा येथून किसान सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे हे यात्रा जिल्ह्यात काल पदार्पण करून पुसद येथून माहूर येथे मुक्काम करून दि ८ मार्च रोजी घाटंजी येथे मुक्कामास येणार आहे दरम्यान तालुक्यातील पहिले गाव असलेल्या भांबोरा येथे या रॅलीचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे यावेळी माजी प. स. सदस्य सहदेव राठोड स्वानंद चव्हाण सह अनेक शेतकरी रॅलीचे स्वागत करतील नंतर तळणी येथे शांताई सभागृहात छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले असून युवा नेते तथा अभ्यागत मंडळाचे सदस्य शाहिद रयानी व सरपंच राम मसराम यांच्या पुढाकाराने गावातील शेतकरी वर्गाला आदरणीय प्रकाशभाऊ पोहरे अविनाशजी काकडे गजानन अमदाबादकर सतीशचंद्र रोठे व उपस्थित मान्यवर संबोधित करणार आहे त्यानंतर डांगरगाव येथे प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थांच्या वतीने रॅलीचे स्वागत करून सभेचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर कुऱ्हाड येथील नवनिर्वाचित सरपंच रंजीत महल्ले रमेश जी जयस्वाल अनिल महल्ले व ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करण्यात येईल त्यानंतर पांढुर्णा बुद्रुक येथे नवनिर्वाचित सरपंच ताई गजानन ठावरी व इतर मान्यवरांच्या हस्ते रॅलीचे स्वागत करण्यात येईल नंतर पांढुर्णा खुर्द येथे विकासगंगा संस्था चे अध्यक्ष रंजीत भाऊ बोबडे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच रितेश बोबडे व इतर मित्र मंडळाच्या वतीने विकासगंगा संस्थेच्या फार्महाऊसवर चहा नाश्ता व सभेचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर घाटंजी शहरातून ही रॅली मार्गक्रमण करीत खापरी नाका येथील बाळकृष्ण मंगलम येथे छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेत वरील सर्व उपस्थित मान्यवर मार्गदर्शन करतील या वेळी घाटंजी येथील गणमान्य प्रतिष्ठित शेतकरी व व्यापारी वर्ग उपस्थित राहणार आहे.

तर दि ९ मार्च रोजी सकाळी ही रॅली खापरी दहेली येळाबारा मार्गे सोनखास येथील स्वागत स्वीकारत मेटीखेडा येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर राळेगाव येथे मुक्कामी जाणार आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करत असे कायदे लागणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्याकरीता या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून संबंधित रॅलीस या माध्यमातून उपस्थित राहून दिल्ली येथील आंदोलकांना पाठिंबा देण्याकरिता सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

———————-

Copyright ©