यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यात तीन मृत्युसह 301 जण पॉझेटिव्ह तर 236 जण कोरोनामुक्त

 

यवतमाळ, दि. 7 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 301 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 236 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 61 वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष आणि पुसद येथील 62 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या 301 जणांमध्ये 186 पुरुष आणि 115 महिला आहेत. यात यवतमाळातील 100 रुग्ण, पुसद येथील 75, दिग्रस 65, दारव्हा 10, आर्णी 9, नेर 9, घाटंजी 7, बाभूळगाव 5, कळंब 4, महागाव 4, वणी 4, पांढरकवडा 3, उमरखेड़ 3 आणि 3 इतर शहरातील रुग्ण आहेत.
रविवारी एकूण 1516 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 301 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1215 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1937 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 19274 झाली आहे. 24 तासात 236 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 16859 आहे. तर जिल्ह्यात एकूण 478 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 172588 नमुने पाठविले असून यापैकी 171044 प्राप्त तर 1544 अप्राप्त आहेत. तसेच 151770 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Copyright ©