यवतमाळ

बनावट टीसी जोडून बनले सरपंच, तहसिलदार कारवाई करणार का?

खोटी माहिती देणार्‍यावर कारवाई करा

तहसीलदारांना निवेदन;जिल्हाधिकार्‍यांकडेही तक्रार

यवतमाळ, ता.  : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रासोबत बनावट कागदपत्र जोडल्या प्रकरणी संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नरहरी हारगुडे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवदेनतान केली आहे. मडकोना ग्रामपंचायत निवडणुक नुकतीच झाली. या निवडणुकीत एका उमेदवारांने अर्जासोबत कामठवाडा येथील श्री महावीर विद्यालयांचा शाळा सोडण्याचा दाखल जोडला. मात्र, अर्जदारांने माहितीच्या अधिकारात मागीतलेल्या माहितीत संबंधित शाळेत या नावाचा व्यक्ती नसल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे नरेश ढोरे यांनी उमेदवारी अर्जासोबत खोटी माहिती राज्य निवडणुक आयोगाला दिली आहे. त्यामुळे संबंधितावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नरहरी हारगुडे यांनी केली आहे.

Copyright ©