यवतमाळ सामाजिक

कळंब माथा वस्तीमध्ये दुषित पाण्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात.

नगर पंचायत नंळ योजनेच्या पाईपलाईनचा व्हाल गटारात.
तालुका प्रतिनिधी कळंब. कळंब माथा वस्तीमध्ये पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या नळ योजनेचा पाईप लाईन व्हाल गटारात बुडून राहत असल्यामुळे येथील जनतेला भविष्यात जीवघेणी साथीच्या आजारांची लागण होणार आहे.सविस्तर वृत्त असे की, ओमप्रकाश भवरे यांच्या घराजवळुन वाहणाऱ्या सांडपाण्याची नाली कच्ची असुन सदर नालीला लागूनच कळंब (माथा) वस्तीमध्ये पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाईप लाईनचा व्हाल आहे.सदर व्हाल भोवती टाकं बांधले आहे.परंतु व्हाल जवळ दुषित पाणी थोपवून राहत असल्यामुळे ते पाणी व्हाल मध्ये जाऊन वस्तीमध्ये दुषित पाणी पुरवठा करण्यात येत आहे.तसेच श्री शंकरराव चंदनखेडे यांच्या घराजवळून शेवंताबाई चौधरी यांच्या घराकडे जाणारा 20 फुट रुंदीचा कच्चा रस्ता आहे .या रस्तात्याने संडासचे पाणी वाहत असुन या रस्तत्याला नालीचे स्वरूप प्राप्त झाले आहे .त्यामुळे जीवघेणी साथीच्या आजारांची साथ येवून भयंकर जीवीत हाणी होण्याची शक्यता आहे.तेव्हा त्वरीत सदर नालीचे पक्के बांधकाम करण्यात यावे. एवढेच नव्हे तर संपूर्ण माथा वस्तीला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी 5 ते 6 वर्षे पासुन धुतलेली नाही.त्यामुळे नळाच्या पाण्यात नारु सदृश्य जंतू येत आहे.त्यामुळे महीण्यातुन एकदातरी सदर पाण्याची टाकी धुण्यात यावी अन्यथा भविष्यात जीवघेणी साथीच्या आजारांना आमंत्रण देण्यात येवुन नये अशी विनंती ओमप्रकाश भवरे, शीवा गांवडे हनुमान आत्राम , सतिष मरापे विजुभाऊ थोटे रविभाऊ भोंडे , लक्ष्यमण सहारे उमेश शिंदे व दीनेश राठोड यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी नगरपंचायत कळंब यांना केली आहे.

Copyright ©