यवतमाळ सामाजिक

घाटंजी येथिल जय भीम चौकात माधवराव बागल स्मृतीदिन

विश्वरूप फाउंडेशन च्या वतीने घाटंजी येथिल जयभीम चौकात माधवराव बागल स्मृतीदिन घेण्यात आला.
विश्वरूप फाउंडेशन चे कार्यकर्ते एकत्र येत माधवराव बागल यांना अभिवादन करून छोटेखानी कार्यक्रमात त्यांच्या जीवनपटलावर प्रकाश टाकला. माधवराव खंडेराव बागल यांचा जन्म १८९६ मध्ये झाला. महात्मा फुले राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांचा त्यांचेवर प्रभाव होता. भाई माधवराव सत्यशोधक समाजाचे एक प्रमुख नेते होते. सत्यशोधक समाजाच्या प्रचाराचे कार्य त्यांनी अनेक वर्ष केले होते. सत्यशोधक कार्यकर्ते या नात्याने त्यांनी धार्मिक कर्मकांडाला विरोध केला आणि कामगार वर्गाला न्याय मिळण्याकरिता त्यांनी प्रयत्न केले. कोल्हापुरात बिंदू चौकात त्यांनी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला. त्यावेळी त्या पुतळ्याचे अनावरण स्वतः केल्याचे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी बागल यांच्या विषयी माहिती देत समायोजित मार्गदर्शन केले. या आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्रल्हाद देवतळे सर हे होते तर विश्वरूप फाउंडेशन चे कार्याध्यक्ष सुनिल नगराळे बि. टी. वाढवे, विजय गजबे, चौलमवार सर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संतोष ओंकार, शुभम नगराळे सुजल भालेराव, मोहन पेटेवार यांनीही सहभाग नोदवीला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र मुनेश्र्वर सचिव विश्वरूप फाउंडेशन यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश घरडे यांनी केले.

Copyright ©