यवतमाळ

जिल्ह्यात चार मृत्युसह 280 जण पॉझेटिव्ह 182 जण कोरोनामुक्त

मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 58 वर्षीय, 76 वर्षीय, 55 वर्षीय पुरुष आणि 80 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या 280 जणांमध्ये 178 पुरुष आणि 102 महिला आहेत. यात यवतमाळातील 82 रुग्ण, पुसद येथील 69, दिग्रस 26, पांढरकवडा 8, वणी 6, दारव्हा 13, घाटंजी 2, महागाव 14, नेर 8, उमरखेड़ 8, बाभूळगाव 27, आर्णी 8, राळेगाव 2, कळंब 1, मारेगाव 1आणि 5 इतर रुग्ण आहेत.
शनिवारी एकूण 1505 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 280 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1225 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1875 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 18973 झाली आहे. 24 तासात 182 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 16623 आहे. तर जिल्ह्यात एकूण 475 मृत्युची नोंद आहे.
___________________________________

Copyright ©