यवतमाळ

कळंब यवतमाळ रोडवरील भीषण अपघात एक ठार तर दुसरा गंभीर

कळंब येथील दोन किलोमीटर अंतरावर रोडवरील जगदंबा कॉलेज किसान पेट्रोल पंप जवळ दिनांक 5 मार्च 2021 चे रात्री 7.30 वाजताचे दरम्याने दोन मोटर्स सवार यवतमाळ जाण्यासाठी कळंब वरून निघाले होते. तर यांच्या जगदंबा कॉलेज जवळ डिव्हायडरला धडक बसल्याने यामध्ये यश राजू पांडे 25 वर्ष रा. कळंब माथा हा जागीच ठार झाला. पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच 29 क्यु 6264 हे मोटर सायकल सवार मेठी स्पीड न गाडी चालवत होते.

प्राप्त माहितीनुसार पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच 29 क्यु 6264 ने कळंब वरून उमेश मोहन मराठे वय 35 वर्षे राहणार पाटीपुरा यवतमाळ व यश राजू पांडे वय 25 वर्षे दोघेही मोटरसायकलने डिव्हायडरला धडकल्याने यश पांडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने हे जागीच ठार झाले. तर उमेश मराठे यांना हाताला पायाला जबर मार लागून गंभीर जखमी झाला असता त्याला यवतमाळ शासकीय रुग्णालयात रेफर करण्यासाठी हलवण्यात आली आहे. तर यशचा मृतदेह कळंब ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहे. घटनास्थळावर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Copyright ©