यवतमाळ राजकीय

सावरगाव (मंगी) ग्राम पंचायती च्या सरपंच पदी सविता मोहूर्ले यांची निवड

———————-
तालुक्यातील आंध्रप्रदेश सीमेलगत असलेल्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सावरगाव (मंगि) ग्राम पंचायती च्या सरपंच पदी सौ. सविता दशरथ मोहूर्ले यांची निवड करण्यात आली.
काही दिवसापूर्वी ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात अपक्ष उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव दशरथ मोहूर्ले यांच्या पत्नी सविता मोहूर्ले यांनी अपक्ष निवडणूक लढविली आणि त्या बहुमताने निवडून आल्या. त्यामध्ये सरपंच पदाची सुध्दा त्यांना लाटरी लागली आहे. त्या राजकीय व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहत असल्याने गावकऱ्यांनी त्यांचेवर विश्वास दाखवीत त्यांचेवर गावाचा धुरा सांभाळण्याची जबाबदारी सोपवली आहे. या विश्वासाला आपण तडा जाऊ न देता गावाचा सर्वांगीन विकास हेच ध्येय समोर ठेवून कार्य करणार असून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत राहू असे मनोदय नवनिर्वाचित सरपंच सविता मोहूर्ले यांनी व्यक्त केले. त्यांच्या निवडीचे सर्वत्र आनंद संचारला असून त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Copyright ©