विदर्भ सामाजिक

मोकाट श्वानच्या भक्षस्थानी पडले काळवीट

 

आपल्या कळपापासून भरकटलेले काळवीट हरिण मोकाट श्वानच्या भक्षस्थानी पडल्याची दुर्दैवी घटना माना पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील हॉटेल अमन जवळील उजव्या बाजूला घडली.काही लोकांनी या काळविटास मोकाट श्वानच्या पासून वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मात्र यश आले नाही. याबाबत प्राप्त माहितीनुसार आपल्या कळपा पासून भरकटलेले काळवीट हरण हे मोकाट  श्वानच्या नजरेत पडले. त्यांनी सदर हरणाचा जोरदार पाठलाग सुरू केला.पळताना काळवीट एका कच्च्या रस्त्यावर घसरुन पडल्याने श्वानच्या तावडीत सापडले. याच वेळी अमरावती कडून मुर्तीजापुर कडे येत असताना राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सचिन गावंडे यांच्या नजरेत सदर प्रकार पडला असता त्यांनी सदर काळवीटला वाचविण्याचा प्रयत्न केला.त्यांंनी माना पोलीस स्टेशन तसेच वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांना देखील कळविले.परंतु ते येईपर्यंत खूपच उशीर झाला होता.गावंडे यांनी रस्त्यावरील गाड्यांची देखील मदत घेण्याचा प्रयत्न केला परंतु जखमी हरिणीला घेऊन जाण्यास कोणी तयार नसल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही अमरावती वरून मुर्तिजापूर कडे येत असताना अमन हॉटेल जवळ उजव्या बाजूला दोन श्वानची हरीण (काळवीट) शिकार केली मी वाविण्याचा प्रयत्न केला मना पोलीस स्टेशनला फोन सुद्धा केला वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सुद्धा फोन केला रोड वरील गाड्यांची मदत सुध्दा घेतली पण त्या हरीण ला कोणी गाडीत टाकून घ्याला तयार नाल्याने घायाळ हरीन जागीच गतप्राण झाली श्वानची अखेर शिकार खाण्यास सूर्वात केली या पुढे वन विगागाची तात्काळ मदत मिळावी ही जन सामान्य जनतेची मागणी

सचिन गावंडे
संस्थापक अध्यक्ष
राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था मुर्तिजापूर जी अकोला

Copyright ©