विदर्भ सामाजिक

कोविड तपासणीला मुर्तिजापूरतील व्यापाऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद.

 

    ३०९ व्यापाऱ्यांनी केली कोवीड तपासणी


तालुक्यात कोरोना संक्रमणातची साखळी पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याकरता प्रशासनाच्या वतीने विविध उपायोजना करून मूर्तिजापुर तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी खंबीर पावले उचलली जात आहेत. परंतु काही लोकांच्या चुकीच्या धोरणामुळे तसेच वागणुकीमुळे याला कुठेतरी आळा बसत असून सदर कोरोना संक्रमण थोपवण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुर्तिजापुर येथे कोरोना तपासणी शिबिर घेतले जात असून या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत मुर्तिजापुरकर आपापली कोरोना तपासणी करून घेत आहे.आज दि.५ शुक्रवार रोजी येथील व्यापारी बांधवांनी मोठ्या प्रमाणात कोरोना तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद देत कोरोना तपासणी करून घेतली.आज ३०९ व्यापाऱ्यांनी कोविड तपासणी केली.यामध्ये    यामध्ये आरटीपीसी तपासणी २०८ लोकांनी तर रॅपिड टेस्ट १०१ लोकांनी केली आहे. उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे शहरात कोरोना लसीकरणाला देखील मोठ्या प्रमाणात सुरवात झालेली असून ४५ ते ६० वर्ष वय असलेल्या व्यक्तींंना पूर्वीचे आजार असल्यास कोरोना लस दिली जात आहे.तर ६० वर्षावरील व्यक्तींना कोरोना लस देण्यात येत आहे.त्याच प्रमाणे फ्रन्टलाइन वर्कर असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील कोरोना लस दिल्या जात आहे.

कोरोना आजाराची वाढती पार्श्वभूमि लक्षात घेता शासन निर्देशानुसार मूर्तिजापुर शहरातील नागरिक ,सर्व  दुकानदार व्यापारी वर्गाची कोरोना स्वाब तपासणी करण्याबाबत प्रशासनाने तसे निर्देश दिले आहेत.करिता नागरिक,सर्व दुकानदार, व्यापारी वर्ग यांना दि. ०६/०३/२०२१ शनिवार रोजी कोरोना  स्वाब (swab ) तपासणी शिबिराचे आयोजन जे. बी. हिन्दी न. पा. शाळा मूर्तिजापूर येथे  सकाळी १०.०० ते ३.००  वाजे पर्यन्त करण्यात आले आहे. शहरातील नागरिक,सर्व दुकानदार, व्यापारी वर्ग यांनी आपले स्वाब देऊन तपासणी  स्वतः होऊन  करून घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी नगर परिषद मुर्तीज़ापुर याचे कडून करण्यात आले आहे.

Copyright ©