यवतमाळ सामाजिक

‘आमचा लॉकडाऊन ला प्रखर विरोध आहे ते निर्बंध शिथिल करा.

‘संस्था संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रशासना सोबतच्या बैठकीत केली मागणी सध्या जिल्ह्यात पाहुण्याच्या हातून साप मारण्याचा प्रकार सुरू असून आम्ही सामाजिक कार्यकर्ते,संस्था प्रतिनिधी यांना लॉक डाऊन करताना आम्ही विश्वासात घेतले हे दाखवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद व निवासी उपजिल्हाधिकारी यांना संस्था प्रतिनिधींची बैठक बोलावन्यास सांगितली.अशा दोन बैठका झाल्या.मात्र आजच्याही बैठकीत संस्था,संघटनांनी स्पष्ट सांगितले की आमचा लॉक डाऊन ला टोकाचा विरोध असून आहे ते निर्बंध शिथिल व्हावेत अशी मागणी बैठकीत केली गेली.
तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार,उपविभागीय अधिकारी यांच्या अहवालावर मी लॉक डाऊन जाहीर करेन असे म्हणणे म्हणजे तुम्ही त्या पदासाठी पात्र नाही वा निर्णय क्षमता गमावलेले आहात हे सिद्ध होते.त्यांनी स्वतः लोकप्रतिनिधी व संस्था प्रतिनिधी सोबत चर्चा करावी.आमच्या भावना समजून घ्याव्यात.असे बैठकीत उपस्थितांनी ठणकावून सांगताना
या पुढे अन्य अधिकाऱ्यांनी आमच्या बैठका घेऊ नयेत हे ही सांगितले गेले.सर्व संस्था प्रतिनिधींच्या या विषयावरील भावना अतिशय तीव्र होत्या.
बैठकीला उप विभागीय अधिकारी बक्षी,संस्था समन्वयक प्रा.घन: शाम दरणे,ad,जयसिंग चव्हाण,अनंत कौलगीकर,अजय बिहादे,विजय मुंदडा, सूकांत वंजारी आदी प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

Copyright ©