यवतमाळ सामाजिक

हिवरी मध्ये कॉरोनाची लागण

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हिवरी गावात ४कोरोना रुग्ण आढळले कॉरोनाची प्रसार दिवसेंदिवस वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही यवतमाळ तहसील अंतर्गत हिवरी येथे ४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने गावात चितीचे वातावरण निर्माण झाले आहे हिवरी येथील एकाच कुटुंबातील ३ तर १नातेवाईकास कॉरोनाची लागण झाली हिवरी येथे आरोग्य केंद्रा मार्फत आर. टी. पी. सी. आर. ची तपासणी करणे गरजेचे असून कोरोना बाधीत रुग्णावर योग्य ते उपचार करणे व त्या रुग्णांना गावकऱ्यां संपर्कात येवू नये या साठी आरोग्य केंद्राकडून जनजागृती करणे व गावकऱ्यांच्या प्राणाचे रक्षण करण्यात मदत होईल या पासून बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी मास्क, सॅनिटाझर सुरक्षित अंतर ठेवून हिवरी गावातील नागरिक गर्दी व एक मेकांच्या संपर्कात येत असून या प्रकरणी प्रशासनाने योग्य लक्ष देणे गरजेचे आहे

Copyright ©