यवतमाळ सामाजिक

अशोक उमरतकर यांनी केला वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा

 

वाढदिवस म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील खास दिवस. नवीन वस्तू, कपडे खरेदीची लगबग असतेच, सोबत नामांकित हॉटेलमध्ये जाऊन केक, खाण्या-पिण्याची पार्टी होते ती वेगळीच. एकमेकांना केक भरवताना तोंडाला केक फासायचा, भरमसाट खाद्यपदार्थ ऑर्डर करायचे आणि जास्त झाले की टाकून द्यायचे. थोडक्यात काय, तर पैसा, अन्न, वेळ याची नासधूस करायची. मात्र वाढदिवस साजरा करण्याच्या या पद्धतीला समाजकार्याचे स्वरूप देत आगळावेगळा संदेश देण्याचे कार्य कळंब येथील यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस श्री. अशोक उमरतकर व मित्र परिवार तर्फे आर्णी तालुक्यातील उमरी पठार स्थित संत श्री. डोला महाराज वृद्धाश्रम येथे भेट देऊन करण्यात आले.
वाढदिवस साजरा करताना आपण या समाजाचे देणे लागतो याची जाणीव प्रत्येकाने ठेवत शक्य तेवढी सहायता राशी दिली.
कुण्या एका माणसाच्या मोठ्या मदतीपेक्षा हजारो लोकांच्या छोट्या-छोट्या मदतीतुनच एक मोठी मदत तयार होत असते. आपणही आपला वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून जर तो अशा विधायक उपक्रमासाठी वापरला तर देशात एकही माणुस उपाशी राहणार नाही, बेघर राहणार नाही, उघडा फिरणार नाही, उपचाराविणा मरणार नाही.गरज आहे फक्त हा विचार रूजवण्याची,मदत छोटी असो किंवा मोठी, ती माणुसकी जपत केली की त्याचे मोल अधीक वाढते.
यावेळी श्री महेशभाऊ जयस्वाल, श्री अंकुश आगलावे, श्री शेख मुश्ताक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते शेख रुस्तम व मित्र परिवारातर्फे होईल तेवढी रोख स्वरूपात मदत करण्यात आली. संत दोला महाराज वृद्धाश्रमाचे संस्थापक-संचालक सेवाव्रती श्री शेषरावजी डोंगरे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
श्री शेषरावजी डोंगरे यांनी श्री अशोक उमरतकर यांचे वाढदिवसानिमित्त शाल देवून अभिष्टचिंतन केले.

Copyright ©