यवतमाळ सामाजिक

घाटंजीच्या आठवडी बाजारात नियमांचे उल्लंघन बेशिस्त लोकांवर कारवाई करण्याची सुज्ञ नागरिकांची मागणी

घाटंजी:- कोरोना ग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून त्याचा नागरिकावर काही परिणाम होत नसल्याचे जणू दिसत आहे घाटंजी शहरात भरत असलेल्या मंगळवारच्या आठवडी बाजारातील गर्दी पाहून असे चित्र दिसून आले ग्राहक व दुकानदारांनी पोलीस आणी न.प. कर्मचाऱ्यांना पाहूनच मास्क लावलेले होते. त्यामुळे घाटंजी शहरात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण जिल्ह्यातून शेकडोच्या संख्येने भाजी, फळे, धान्य,विक्रेते व इतर व्यावसायिक व्यवसाय करण्याकरिता या आठवडी बाजारात येत असतात जवळच्या ग्रामीण भागातील तसेच घाटंजी शहरातील ग्राहकही मोठ्या संख्येने बाजारात येतात त्यामुळे सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आव्हान करण्यात येत आहे. सध्या यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाने चागलेच डोके वर काढले. असून गर्दीच्या ठिकाणी संसर्ग पसरण्याची भीती असल्याने जिल्ह्यांमध्ये संचार बंदी लागू केली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेमध्ये नागरिकांची गर्दी होणार नाही याबाबत स्थानिक प्रशासन यांनी दक्षता घेऊन त्याबाबतच्या प्रतिबंधक उपाययोजना त्यांच्या स्तरावरून करून गर्दीस प्रतिबंध करावा असा आदेश जिल्हाधिकारी यांनी नुकताच काढलेला आहे. मात्र नागरिकांना भीती नसून या आठवडी बाजारात
मास्क न लावता मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे प्रशासनाने विशिष्ट ग्राहकांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणीही सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

Copyright ©