महाराष्ट्र सामाजिक

हारफुलांची विक्री करणाऱ्या गरीब महिलेच्या प्रामाणिकतेचे कौतुक

 

शशिकांत ठसाळ यांचे पाकीट मनसे वृत्तपत्र वाचनालय कट्टा यशोधननगर, ठाणे येथे काल गहाळ (पडले )झाले होते. त्यात त्यांची महत्वाची कागदपत्रे व रोख रक्कम होती. ते पाकीट तेथे हारफुलांची विक्री करणाऱ्या अनिता राजभर या महिलेला सापडले होते त्यांनी ते प्रामाणिकपणे शशिकांत ठसाळ यांना परत केले. ठाणे गवळी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत ठसाळ यांनी आज या गरीब महिलेच्या प्रामाणिकतेचे कौतुक व आभार तीला रोख रक्कमेचे बक्षीस देऊन व्यक्त केले

असे प्रामाणिकपणा दाखवणारी लोक खूप कमी आहेत. आज या ताईने माझा पाकीट मला परत करून अजून माणूसकी जिवंत आहे हे दाखवून दिले. आज आपण सर्व पगारदार लोकं आहोत आपला पगार महिन्याने होतो संपूर्ण महिना याच पगारावर चालत असतो जर हे असं घडलं तर त्या कुटुंबावर काय परिणाम होतो याचा प्रत्यय आज मला आला म्हणून माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की असं कोणावर प्रसंग आलं तर तुम्ही ही माणुसकी दाखवून ती त्यांची वस्तू परत कराल व त्या कुटुंबावर येणारी उपासमारीची वेळ तुमच्या माणूस म्हणून या नात्याने थांबेल कारण ही वेळ आज माझ्यावर आली होती पण सुदयवाने मला माझा पाकीट या माऊली मुले मिळाला. समजा आज त्यांनी माझा पाकीट दिला नसता तर मी काही ही करू शकलो नसतो, पण त्यांचा तो दिवस खूप चांगला गेला असता, पण समजा उद्या ही वेळ त्यांच्यावर आली असती तर त्यांचा तो दिवस खूप वाईट जाणार ना म्हणून आपले कर्म चांगले तर आपलं कोणीही वाईट बघू शकत नाही हे आज सिद्ध झालं असं मत शशिकांत ठसाळ यांनी बोलतांना वेक्त केलं

Copyright ©