Breaking News यवतमाळ

आमनी शिवारात अज्ञात इसमाचा आढळला मृतदेह, महागाव तालुक्यातील घटना

महागाव : नुकतीच हाती आलेल्या माहितीनुसार महागांव तालुक्यातील आमनी बु. शिवारातील एचपी गॅस गोडाऊन नजीक असलेल्या नाल्याच्या कडेला एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. सदर घटना आज दि.२ मार्च रोजी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास भटकंती करणाऱ्या लोकांच्या नजरेने उघडीस आली. घटना स्थळावरून वास येत असल्याचे पाहून त्या ठिकाणी मृत्यूदेह आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटना स्थळी पोलीस निरीक्षक विलास चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू, पोलीस शिपाई प्रमोद पवार हे दाखल झाले. मृतकाच्या अंगावर पांढरा चौकडा शर्ट, जीन्स पॅन्ट असून पायात पांढरे बूट आहे. अद्याप इसमाची ओळख पटली नसल्याचे सूत्रांनी सांगितले असून सदर घटनेची वार्ता परिसरात वाऱ्या सारखी पसरताच जनतेत विविध चर्चेला उधाण आल्याचे चर्चील्या जात असून घातपाताची तर नाही ना अशी शंका वर्तविली जातेय. दरम्यान, इसमाचा मृतदेह हा सवना येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून पुढील तपास महागांव पोलीस करीत आहे.

Copyright ©