महाराष्ट्र सामाजिक

गवळी सेवा फाऊंडेशन व साईच्छा इलेव्हन मंडळ यांची संयुक्तपणे GSF प्रीमियर लीग संपन्न

 

GSF प्रीमियर लीगचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले तन्मय स्टार संघ

गवळी सेवा फाऊंडेशन व साईच्छा इलेव्हन मंडळ दिवा विभाग जिल्हा ठाणे याठिकाणी *GSF प्रीमियर लिग २०२१ सयुक्तपणे* रविवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ रोजी बेडेकर नगर दिवा विभाग जिल्हा ठाणे याठिकाणी उत्साहाने पार पडली. विभागातील १२ टीम या स्पर्धेत खेळवण्यात आल्या, तन्मय स्टार संघ या प्रीमियर लीगचा प्रथम मानकरी ठरला तर तन्मय पॅकर्स दृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.या कार्यक्रमाचे नियोजन विभागातील गवळी सेवा फाऊंडेशन व साईच्छा इलेव्हन मंडळाचे पदाधिकारी यांच्या सहमताने करण्यात आले, गवळी सेवा फाऊंडेशनचे दिवा विभाग अध्यक्ष संदीप घोले व साईच्छा इलेव्हन मंडळाचे अध्यक्ष संदीप घाडीगांवकर यांनी या स्पर्धेसाठी अथक प्रयत्न घेतले.
सामाजिक कार्यासाठी तरूण पिढीला क्रीडा क्षेत्रांतील आवड निर्माण करणे व प्रोत्साहन देणे हा या सामान्यांचा मुळं उद्देश होता.
या कार्यक्रमासाठी बेडेकर नगरचे समाजसेवक शशिकांत बेडेकर यांचे चिरंजीव तन्मय बेडेकर,गवळी सेवा फाऊंडेशनचे संस्थापक दिनेश भोजने, संस्थापिका दिक्षाताई भोजने, कोकण विभाग सल्लागार सुरेश ठसाळ, ठाणे जिल्हा अध्यक्ष शशिकांत ठसाळ, ठाणे जिल्हा सचिव मनोहर महाडिक, स्वयंसेवक मंगेश ठसाळ, व साईच्छा इलेव्हन मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

Copyright ©