सामाजिक

मोरारजी चौकातील अंडरग्राउंड नाला सफाई कार्य प्रगतिपथावर

 

 

स्थानिक नगरपरिषद मार्फत सन 2013-14 चौकातील अंडरग्राउंड नाला बनविण्यात आला होता. मात्र त्याच्या तोंडावर जाळी बसविण्यात आली नव्हती. त्यामुळे या नाल्यातून वाहणाऱ्या पाण्यात व्यतिरिक्त अन्य साहित्य, काडी-कचरा नाल्यात थांबत गेला. मागील आठवड्यापासून नाल्याची स्थिती बुजल्यागत झाली होती .परीणामी प्रवाही घाण पाणी रस्त्यावर येऊ लागले होते.या बाबत सोशल मीडिया तसेच काही नागरिकांनी या समस्येविषयी मुख्याधिकारी विजय लोहकरे यांना लेखी निवेदनाद्वारे अवगत केले होते. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता सध्या स्थितीत नगरपरिषद क्षेत्रात लाँकडाऊन सुरू आहे .रस्त्यावरील वाहतूक नाहीशी असल्याने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाद्वारे दखल घेऊन काम 1 मार्च 2021 पासून सुरु आहे. रस्त्यावर 3 चेंबर हँन्ड ब्रेकर ने फोडुन उपलब्ध साहित्याच्या आधारे सफाई कर्मचाऱ्यांनी नाला साफसफाई करण्याचे काम सुरू असून अडकलेल्या कचरा काढण्यासाठी अग्निशमन बंबाच्या प्रेशर चा वापर करण्यात येत आहे. आतापर्यंत चार ट्रॅक्टर कचरा उचलण्यात आला आहे व आणखी तीन-चार ट्रॅक्टर कचरा नाल्यात अडकलेला असल्याची शक्यता आहे.नाला सफाई चे काम अविरतपणे सुरू आहे.या कामासाठी समाजसेवक कमलाकर गावंडे , बांधकाम अभियंता पुरषोत्तम पोटे,आरोग्य निरीक्षक विजय लकडे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य कर्मचारी पप्पू देशमुख ,शालीग्राम यादव, मशरूल खान, अग्निशमन वाहन चालक रवींद्र जवंजाळ ,आसिफ खान सह बहुसंख्य सफाई कर्मचारी नाला साफ- सफाई करीत आहे. मोरारजी चौकातील अंडरग्राउंड नाला साफ सफाईचे कार्य प्रगतिपथावर आहे.साफ-सफाई होताच या नाल्याच्या तोंडावर जाळी त्वरीत बसविण्यात यावी. जेणेकरून आज निर्माण झालेली समस्या भविष्यात निर्माण होणार नाही याची दखल घेण्याची मागणी होत आहे.

Copyright ©