यवतमाळ राजकीय

सौ.चित्रा वाघ यांचेवर सोशल मिडीयावर बदनामीकारक पोस्ट करणाऱ्यां समाजकंटकावर सायबर क्राईमनुसार गुन्हे दाखल करा ! भारतीय नारी रक्षा संघटना .

 

गृहमंत्री अनिल देशमुख यांना जिल्हाधिकारी यांचे मार्फत दिलेल्या निवेदनातुन मागणी

यवतमाळ -: पुणे येथील युवती पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी सौ.चित्रा वाघ यांनी केली आहे.पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एका महिलेने त्या युवतीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असुन मात्र न्यायाची मागणी करणाऱ्यां सौ.चित्रा वाघ यांचेवर मंत्र्यांच्या समर्थकांनी बदनामीकारक पोस्ट तयार करुन सोशल मिडीयावर व्हायरल केल्या.भारत देश हा संस्कृती प्रधान देश असुन भारतात महिलांचा आदर करणे ही आपली संस्कृती असतांना अश्या प्रकारे एका महिलेचे खच्चीकरण करणाऱ्यां समाजकंटकावर सायबर क्राईम नुसार गुन्हा नोंदवुन अटक करावी तसेच पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी सि.बी.आय चौकशी करुन सत्य बाहेर काढुन दोषीवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी भारतीय नारी रक्षा संघटनेकडुन करण्यात येत आहे.यावेळी दुर्गा पटले,मनिषा तिरणकर,वर्षा चव्हाण, संगिता सरोदे,रंजना येळे,विनोद दोंदल,सुकांत वंजारी,किशोर कुळसंगे आदी उपस्थित होते.

Copyright ©