Breaking News यवतमाळ सामाजिक

*अविनाश चव्हाण व त्यांचा साथीदारांवर* *मकोका (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई*

 

 

अवैध रेती तस्करी हल्ला प्रकर

 

यवतमाळ, दि. 2 : उमरखेड येथील कुख्यात गुंड अविनाश प्रकाश चव्हाण व त्याच्या साथीदाराने नायब तहसीलदार व तलाठी यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात करण्यात आली आहे.

 

अविनाश चव्हाण व त्याच्या साथीदाराने अवैध रेती प्रकरणी 23 जानेवारी 2021 रोजी उमरखेड येथील नायब तहसिलदार वैभव पवार व त्यांचे पथकावर चाकुने हल्ला केला होता. याप्रकरणी उमरखेड पोलिस स्टेशनमध्ये 24 जानेवारी रोजी अविनाश चव्हाण व त्याचे साथीदारांविरूध्द कलम 307, 397, 395, 353, 332 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख अविनाश चव्हाण व त्याचे इतर साथीदारांचा शोध घेण्याकरीता वेगवेगळी पथके तयार करून त्यांचे अटकसत्र राबविण्यात आले. आरोपी अविनाश चव्हाण व त्याच्या साथीदारांविरूध्द खुन, खुनाचा प्रयत्न, खुनासह दरोडा, गंभीर जखमी करून दरोडा, अग्नीशास्त्राचा वापर करून दरोडा, खंडणी, घरफोडी, चोरी, दंगा, सरकारी नौकरांवर हमला, महिलांवर अत्याचार, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याने त्याच्या विरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 (एमसीओसीए) अन्वये कार्यवाही करण्याची परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून अमरावती परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक यांच्याकडे मंजूरीकरीता सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावाला पोलिस उपमहानिरिक्षकांनी मंजूरी दिली असून सदर गुन्ह्यात एमसीओसीए लावण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उमरखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी वालचंद मुंढे करीत आहेत.

 

जिल्ह्यात गुन्हेगारी स्वरुपाच्या कारवायांमुळे सामाजिक शांतता व सुव्यस्थेस बाधा निर्माण होणार नाही व गुन्हेगारांना वेळीच प्रतिबंध होणे आवश्यक असल्याने अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरूध्द प्रचलित कायद्यांनुसार एमसीओसीए, एमपीडीए, हद्दपार अशा कठोर कारवाया करण्यात येणार आहे. मकोका अंतर्गत उमरखेड उपविभागातून ही पहिली कार्यवाही झाली आहे. यापूढे जिल्ह्यातील इतर उपविभागातसुध्दा अशा प्रकारच्या कठोर कारवाया करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

 

यवतमाळ जिल्ह्यातील गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारे गुन्हेगार व अशा गुन्हेगारांना पाठीशी घालणा-या व्यक्ती / टोळीवर अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच जनतेनेही अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या व्यक्ती, टोळ्या बाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखा तसेच वरिष्ठ पोलीस अधिका-यांना द्यावी, असे आवाहन यवतमाळ जिल्हा पोलिस दलाच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केली आहे.

 

_____________&____________

 

पुसद व परिसरात कडक संचारबंदी

 

3 मार्चपासून नवीन निर्देश जारी

 

यवतमाळ, दि. 2 : पुसद येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपविभागीय अधिकारी यांनी पुसद शहर तसेच काकडदाती ग्रामपंचायत क्षेत्र, श्रीरामपूर ग्रा.पं. क्षेत्र, धनकेशवर ग्रा.पं.क्षेत्र, शेंबाळपिंपरी ग्रा.पं.क्षेत्र, बेलोरा ग्रा.पं.क्षेत्र, जांब बाजार ग्रा.पं.क्षेत्र, वरूड ग्रा.पं.क्षेत्र या ठिकाणी अटी व शर्तीच्या अधीन राहून संचारबंदी लागू करण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144(1)(2)(3) मधील तरतुदीनुसार कोविड -19 चा प्रादुर्भाव होवू नये याकरीता, सादर केलेल्या प्रस्तावानुसार दिनांक 3 मार्च 2021 ते दिनांक 8 मार्च 2021 च्या मध्यरात्री पावेतो खालील नियम लागू करण्यात येत आहेत.

 

पुसद शहर व शहरालगत असलेल्या वर दर्शविण्यात आलेल्या ग्रामीण भागातील सर्व प्रकारची जीवनाश्यक दुकाने, किराणा, स्वस्त धान्य दुकाने ही सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत सुरु राहतील. पुसद शहर व शहरालगत वर दर्शविण्यात आलेल्या क्षेत्रामधील सर्व प्रकारची बिगर जीवनाश्यक दुकाने, आस्थापना बंद राहतील. नमुद क्षेत्रातील सर्व प्रकारची आठवडी बाजार बंद राहतील. सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरु न ठेवता फक्त पार्सल सुविधेस परवानगी राहील. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये (महाविद्यालय, शाळा) येथील शैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई-माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे ई. कामाकरीता परवानगी अनुज्ञेय राहील. मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरु राहील आणि वाहतूकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही. स्थानिक पोलीस स्टेशन अधिकारी, तहसिलदार यांनी सार्वजनिक वाहतुक अंतर्गत बस स्टेशन या ठिकाणी येणारे – जाणारे प्रवासी यांना व

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©