Breaking News

कुरूम प्रा.आ.केंद्राला जिल्हाधिकारी यांचेसह मुख्यकार्यकारी अधिकारी यांची आकस्मिक भेट

 

तालुक्यातील ग्राम कुरुम येथे अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचेसह जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी आज १ मार्च रोजी दुपारी  स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र कुरूमला आकस्मिक भेट देऊन पाहणी केली.

यावेळी त्याचे समवेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश असोले,मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते,मूर्तिजापूर पं.स.गटविकास अधिकारी बाळासाहेब बायस,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुधीर कराळे, डॉ.अमित कावरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रा.आ.केंद्र कुरूमच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल काळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्यकार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी कुरुम प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय आरोग्य कक्ष, संगणक कक्ष,प्रयोगशाळा कक्ष,औषधी कक्ष,इंजेक्शन कक्ष,महीला व पुरुष शौचालय,आरोग्य – सभा कक्ष,आंतररुग्ण कक्ष १ व २,नवजात शिशु आगमन कक्ष , शस्त्रक्रीया कक्ष,औषधी भंडार कक्षाची पाहणी केली व आरोग्य विषयक योजना गुणवत्ता पूर्वक वेळीच राबविल्या जात असल्याबाबत भेटी दरम्यान जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे निदर्शनास आले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत करण्यात येणाऱ्या कोरोना आजारा संबंधी स्थानिक अधिकारी वर्गाकडून आढावा घेतला.व कोरोना आजारा विषयी रोकधाम करण्यासाठी सूचना केल्या.तर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी आरोग्य केंद्राच्या सोयी सुविधा व समस्या बाबत आढावा घेतला.

यावेळी प्रा.आ.केंद्राचे साथरोग अधिकारी संजय घाटे यांनी गेल्या २०२० पासून  कोविड-१९ या कार्यात अतिशय प्रामाणिक पणे सहभागी होऊन या कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडली याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शब्द सुमनांनी कोविड योध्दाचे स्वागत केले.

यावेळी सरपंच वाठ,उपसरपंच इम्रान खान, प्रा.आ.केंद्र कुरूमचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल काळे, डॉ.स्नेहलता अरबट, साथरोग अधिकारी संजय घाटे,औषध निर्माण अधिकारी मंजुश्री मार्गे,अधिपरिचरिका रिटा धनबहादूर, आ.सेविका संगीता पुरी,उपकेंद्र आ.सेविका एम. व्ही.सोळंके,कनिष्ठ सहायक कैलास बागडे,वाहनचालक मो.हुसेन,गटप्रवर्तक ए.डी.गारपवार,परिचर निलेश बायस्कर, मो.वाजिद,पंजाब सरदार,शोभा अंभोरे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Copyright ©