यवतमाळ राजकीय

घाटंजी तालुक्यातील पन्नास पैकी अडतीस ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात..!

घाटंजी तालुक्यातील पन्नास पैकी अडतीस ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात आल्याचे, प्रतिपादन आर्णी – चंद्रपूरचे खासदार सुरेश उर्फ बाळु धानोरकर यांनी केले. ते घाटंजी येथील विश्राम भवनावर आयोजित एका छोटेखानी बैठकीत बोलत होते. बैठकीत विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री अँड. शिवाजीराव मोघे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून घाटंजी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष डॉ. विजय कडू उपस्थित होते.
या प्रसंगी खासदार धानोरकर म्हणाले की, ग्रामीण भागात एकंदर शेतकरी, शेतमजूर वर्ग आहे. कुठे कुठे हेच लोक ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत भाग घेत असतात. मात्र, काही गावात आपली खुन्नस काढण्यासाठी गटा – तटाचा आधार घेउन आप आपले बदले काढत असतात, हे चुकीचे असून पोलीस विभाग व महसुल विभागाने ससाणी प्रकरणात सांमज्यासी भुमीका घेऊन प्रकरण हाताळावे, अशी सूचना या प्रसंगी धानोरकर यांनी या वेळी केली.
विशेष म्हणजे खासदार सुरेश उर्फ बाळु धानोरकर यांचेशी घाटंजी तालुका पत्रकार संघटना ही नाराज होती. मात्र, घाटंजी तालुका पत्रकार संघटनाचे अध्यक्ष राजु चव्हाण, सचिव महेंद्र देवतळे, ज्येष्ठ पत्रकार सुधाकर अक्कलवार, अनंत नखाते, चंद्रकांत ढवळे, अरुण कांबळे, अस्लम कुरेशी, संतोष अक्कलवार आदींशी चर्चा करून त्यांची नाराजी खासदार धानोरकर यांनी आज दुर केली आहे.
या वेळी घाटंजीचे ठाणेदार बबन कराळे, तहसीलदार पुजा माटोडे, घाटंजी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष डॉ. विजय कडू, घांटजी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष गोडे, माजी सभापती परेश कारीया, माजी सभापती सतिष मलकापुरे, घाटंजी पंचायत समितीचे माजी सभापती रुपेश कल्यमवार आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी तालुक्यातुन निवडून आलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना खासदार बाळु धानोरकर यांनी शुभेच्छा दिल्या. आभार डाँ. विजय कडू यांनी मानले.

Copyright ©