यवतमाळ राजकीय

पाढुंर्णा आदर्श गावाला मिळाला पहिल्यादाच उच्च शिक्षीत सरपंच

 

लाडखेड – तालुक्यातील महत्वाची समजल्या जाणाऱ्या पांढुर्णा ग्राम पंचायती च्या सरपंच पदी  रत्नदिप यादव तर उपसरपंच पदी शितल पांडव यांची निवड करण्यात आली.
संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या पांढुर्णा ग्राम पंचायती मध्ये गटात चुरशीची लढत झाली. पाढुर्णा आदर्श गावाला पहिल्यांदाच उच्चशिक्षीत तरून तडफदार सरपंच लाभल्याने गावात हर्षा उल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आधी पाढुंर्णा बोधगव्हान गट ग्राम पंचायतचे २० वर्ष सरपंच पद भुसविलेले माजी सरपंच श्री यादव पवार त्यांचे हे चिरंजीव बोधगव्हान आणि पादुर्णा मिळून गट ग्राम पंचायत असलेल्या या दोन्ही गावा मिळून एकुन ९ सदस्याची संख्या असुन नऊ पैकी ६ जण बी जे पी प्रणित असल्याने या ठिकाणी बी जे पी चा झेंडा फडकवीला आहे. निवडुन आलेल्या नव निर्वाचित सदस्या मध्ये उपसरपंच पदी शितल मंगेश पांडव, सदस्य म्हणुन रेणुका अजय चौधरी,नारायण पुंडलिक आरू,आरती सुमेध गडपायले,वेणुबाई शंकर लंगडे,तर तीन सदस्य हो विरोधा मध्ये गेली सरपंच पदी विराजमान झालेले रत्नदिप हे अवध्या ३३ वर्षाचे असुन त्यांचे शिक्षण हे बी . एस . सी एग्री व व्यवसथापनामध्ये पोस्ट ग्रॅज्युट ( एम . बी . ए)आहे. पाच वर्षीच्या कार्यकाळा मध्ये सर्वाचे घर चांगले असने,गावाच्या सांडपाण्याची योग्य विल्लेवाट, गावात पीण्यासाठी स्वच्छ पाणी, शेतकर्यांना प्रत्येक योजनेचा लाभ, गावात सर्वीकडे सीमेंट रस्ते, समोरील पीढी चांगली निघावी म्हणुन गावाल दजैदार शिक्षण,व्यसन व तंटामुक्ती गाव असा प्रण रत्नदिप यांनी केले.

Copyright ©