Breaking News

तोतया पोलीस बनून लूटमार– दोघांना अटक

 

मोटरसायकलस्वारांना अडवून पैसे उकळणाऱ्या दोन तोतया पोलिसांना माना पोलिसांनी शनिवार २७ फेब्रुवारी रोजी अटक केल्याची घटना घडली.

प्राप्त माहितीवरून फिर्यादी समीर  खान आसिफ खान वय २४ वर्षे रा.रोशनपुरा मूर्तिजापूर हे चुलत बहिणीच्या लग्नाचे कपड्याची खरेदीसाठी अमरावती येथे त्याचे मित्रासह मूर्तिजापूर,हिरपूर, बोर्टा,भातकुली मार्गे अमरावतीला मोटरसायकलने जात असतांना पेढी नदीच्या पुलाजवळ हिवरा कोरडे फाट्या समोर सोमवार २२ फेब्रुवारी रोजी आरोपी श्रीकृष्ण साहेबराव बुरघाटे वय ३४ वर्षे रा.हिवरा कोरडे,मंगेश उत्तमराव बुरघाटे वय ३६ वर्षे रा.शिवर अकोला यांनी फिर्यादी समीर खान यांना थांबवून आम्ही पोलीस आहोत तुझे लायसन्स दाखव म्हटले.यावेळी फिर्यादीने लायसन्स नसल्यामुळे तोतया पोलीस आरोपींनी म्हटले की आम्ही तुझ चालान फाडतो म्हणून सांगितले.यावेळी फिर्यादीने सदर आरोपींतांना १०० रुपये देऊन अमरावतीकडे जाण्यास निघाले.अमरावती वरून लग्नाचा बस्ता घेऊन परत सायंकाळी ६ वाजता दरम्यान आरोपितांनी पुन्हा फिर्यादिस त्याच ठिकाणी थांबवून लायसन्स दाखव म्हणून सांगितले.यावेळी दोघेही आरोपी दारू पिलेले होते.यावेळी फिर्यादी यांनी तुम्ही पोलीस वाले नाही.तुम्ही शिविल ड्रेसवर आहात.तुमचे आय कार्ड दाखवा असे म्हटले असता सदर आरोपितांनी फिर्यादी सोबत हुज्जत घातली व फिर्यादिच्या मित्राने व्हिडीओ शुटींग घेतली.यावेळी सदर आरोपीं फिर्यादिस शिवीगाळ करत असता फिर्यादीने मोटरसायकलनी निघून गेले फिर्यादी रात्री ९ वाजता ट्रकवर क्लिनर म्हणून चंद्रपूरला निघून गेले.त्यांनी दि. २७ फेब्रुवारीला फिर्यादी पो.स्टे.ला येऊन  जबानी रिपोर्ट दिली.

याप्रकरणी पोलीस स्टेशन माना येथे फिर्यादी समीर खान आसिफ खान याचे जबानी रिपोर्टवरून दोन्ही आरोपी श्रीकृष्ण बुरघाटे,मंगेश बुरघाटे याचे विरोधात कलम १७०, ४१९, ४२०, ५०४,३४ आय पी सी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही आरोपींतांना अटक करण्यात आली असून मूर्तिजापूर पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अधिक तपास माना पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक घनश्याम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हे.कॉ.पंजाबराव इंगळे,ना.पो.कॉ.नंदकिशोर टिकार,पो.कॉ.सचिन दुबे,जयकुमार मंडावरे करीत आहे.

Copyright ©