Breaking News

आरोग्य विभागाच्या झालेल्या पेपर मध्ये गैरप्रकार चव्हाट्यावर पेपर देण्या पूर्वीच विद्यार्थ्यांनी लिहणे सुरू केले पेपर

आज महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवकाचे व कनिष्ठ लिपिकाच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचेआयोजन करण्यात आले यातच हे पेपर घेण्यात येण्या पूर्वी पेपर फोडण्यात आला नागपूर येथील पेपर घेण्यापूर्वीच पेपर फुटलेला विद्यार्थ्यांच्या हातात देण्यात आला कनिष्ठ लिपिक चा पेपर असताना तीन ते पाच या वेळेत पेपर देण्यात येणार होता हा प्रकार राशन नसून इंडस्ट्री इंजीनियरिंग टेक्नॉलॉजी नागपूर येथे कनिष्ठ लिपिक या पदाचा पेपर घेत असतांना पेपर देण्यापूर्वी हा पेपर फोडण्यात आले असल्याचे निदर्शनास आले याप्रकरणी विद्यार्थ्यांनी विचारणा केली असता हा पेपर कहा करूनच फुटलेला आलेला आहे असे सांगत सांगण्यात आले याप्रकरणी काही विद्यार्थ्यांनी विचारणा केली असता त्या विद्यार्थ्यांना मारहाणही करण्यात आल्याची घटना नागपूर मधील रायसोनी इंस्टू. इंजिनीरिंग टेक्नॉलॉजी या कॉलेज मध्ये हि परीक्षा घेण्यात आली या गैर प्रकरणी विद्यार्थ्यांनी पोलिस आयुक्त यांचे कडे लेखी तक्रार दिली यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या स्वाक्षरी केल्या यात हरिदास देविदास श्रीरामे, निखिल गजानन मोहोड, आमिष एकनाथ खारोडे, मारोती हनुमंत उल्ले, मनीषा मारोती डोंगरे, इत्यादींनी निवेदनही दिले यापुढे काय कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे या अगोदरच पेपरमध्ये गैरप्रकार होण्याचे चर्चेला उधाण आले होते विशेष म्हणजे कोरोणा लॉक डाऊन , एकीकडे संचारबंदी दुसरी कडे गर्दी जनतेनी काय समजावे? हे सर्व असताना हा पेपर घेतला कसा ! असा सवालही सर्वसामान्य जनतेकडून विचारण्यात येत आहे यातच याप्रकरणी आरोग्य सेवक काना ही कार्यमुक्त करून सेवेवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते आरोग्य सेविका मध्ये अनेक आरोग्य सेवक पॉझिटिव आल्याची माहिती असताना त्यानाही पेपर देण्यास बळजबरी केल्याचे सांगण्यात आले तर संबंधित अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश दिले, ही एक चिंतेची बाब आहे या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होऊन गैरमार्गाने घेण्यात आलेल्या परीक्षा रद्द करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे या परीक्षेत अनेक गैर प्रकार झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

Copyright ©