Breaking News

कोरोना संक्रमित अहवाल नसताना देखील मुख्याध्यापकांना दाखविले करोना संक्रमित. 

 

येथील रहिवासी असलेले जांभा बुद्रुक येथील नामदेव महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक छत्रपती वाकोडे यांनी १८/०२/२०२१ रोजी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे आर.टी.पी.सी.आर.(rt-pcr)तपासणी केली त्यानंतर दि.२० रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे तीन कर्मचारी ग्रामसेवक कॉलनी येथील त्यांच्या राहत्या घरी आले.त्यांनी छत्रपती वाकोडे यांना तुमचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे असे सांगितले.तसेच तुम्ही हेंडज येथील क्वारंटाईन सेंटर येथे लवकर दाखल व्हा  असे धमकावले.त्यानंतर येथे गेले असता त्याठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कराळे यांना भेटून पॉझिटिव्ह असल्याबाबत  प्राथमिक आरोग्य केंद्राचे ठाकरे यांनी पाठविल्याचे सांगितले परंतु त्यांनी पॉझिटिव असल्याबाबतचा अहवाल मागितला.परंतु मला फक्त तोंडी सांगण्यात आल्यामुळे आणि  कुठलाही अहवाल दिलेला नसल्याचे सांगितले.  त्यावरुन छत्रपती वाकोडे यांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कराळे यांनी स्पष्ट सांगितले की, अहवाल असल्याशिवाय सेंटरमध्ये दाखल करून घेता येत नाही. त्यामुळे मी सतत सहा दिवस लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे चकरा मारल्या. पण तेथे मला अहवाल मिळाला नाही.त्यानंतर मला भ्रमणध्वनीवरून   सात दिवस घरातच अलगीकरण करण्यास बाध्य केले.घरातील लोकांना तपासणीसाठी बळजबरीने घेऊन गेले. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला.परंतु अहवाल दिला नाही.पुन्हा दि.२४ रोजी अहवाल मागण्यासाठी गेले असता तेथील कर्मचारी यांनी सर्व पॉझिटिव रुग्णाची यादी तपासून त्यामध्ये त्यांंचे नाव नाही असे सांगितले. त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.कोरोना पॉझिटिव रुग्णाच्या यादीमध्ये नाावासमोर कोठेही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हचा उल्लेख नाही.त्यामुळे त्यांंना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट देण्यास टाळाटाळ करण्यात आली.यावरून माझा मानसिक छळ करण्यात आला असून प्रकरणी वरिष्ठाकडे तक्रार करणार असून वेळ पडल्यास न्यायालयात धाव घेणार आहे.असेेे छत्रपती वाकोडे यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या लेखी अहवालातून आरोप केले आहेत.पॉझिटिव्ह नसताना देखील मला व माझ्या कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व क्वारंंटाईन राहावे लागले आहे.यावरून सदर कारभाराची कल्पना न केलेली बरी असे त्यांनी म्हटले आहे. लेखी अहवालासह पॉझिटिव्ह यादी व निगेटिव्ह अहवालाची प्रत  दिली आहे.                          ——————————————————————————————————————- सदर इसमाची rt-pcr(स्वब) तपासणी श्रीमती  लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात झाली. परंतु पॉझिटिव्ह रुग्णांच्या यादीत छत्रपती वाकडे यांचे नाव चुकीनेे आले आहे. त्यांचे नाव आय.सी.एम.आर.च्या अधिकृत अहवालात नसल्यामुळे त्याना क्व्वारंटाईन सेंटरला दाखल करण्यात आले नाही. ते निगेटिव्ह होते.पण चुकीने त्यांंचे नाव यादीत आल्यामुळे त्यांना व कुटुंबियांना मनस्ताप सहन करावा लागला.असे पुन्हा घडू नये. याकरीता यंत्रणेने दक्ष राहावे.                                              ———–डॉ. सुधीर कराळे———-

तालुका आरोग्य अधिकारी मुर्तिजापूर.

Copyright ©