विदर्भ

अमरावती विभागाचा विक्रम संचारबंदी आरोग्य सेवकांच्या परीक्षा चे आयोजन

 

सर्वत्र कोरोणाचे संकट सुरू झाले आहे चार ते पाच जिल्ह्यात संचार बंदी लागू करण्यात आली यातच काही ठिकाणी लॉकडाऊन सुरू असताना अमरावती विभागात आरोग्य सेवकांच्या परीक्षा घेण्याची तारीख १ मार्च जाहीर केल्याने चर्चे चा विषय ठरत आहे विशेष म्हणजे यात काही कर्मचारी अधिकारी कोरोणा बाधित असतानाही त्या कर्माच्यारास परीक्षा केंद्रावर बोलावण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले विशेष म्हणणे परीक्षा पासेस परीक्षार्थीना देण्यात हि आल्या

सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये करोना आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे, मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी लॉक डाऊन, संचार बंदी घोषित होत आहे, गर्दीच्या ठिकाणी करोना पसरू नये म्हणून अनेक निर्बंध प्रशासनाकडून आखल्या जात आहे, अमरावती शहरातील कुटुंब आरोग्य प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी नोकरीमध्ये आरोग्य सेवक पदावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित केलेले आहे आहे सदर प्रशिक्षण हे पूर्ण झालेले असून याच केंद्रावर आता एक तारखेपासून वेळापत्रकानुसार परीक्षा आयोजित केलेल्याआहेत, एकूण चाळीस – बेचाळीस प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांपैकी/ कर्मचाऱ्यांपैकी दहा ते बारा कर्मचाऱ्यांना करोना झालेला आहे, यातील काही अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सर्वांना परीक्षा द्यावी लागेल अशा प्रकारचे प्रत्येकाच्या मोबाईल वर मेसेज पाठवलेले आहे अनेक विद्यार्थ्यांची/ कर्मचाऱ्यांची मानसिकताही परीक्षेला सामोरे जाण्याची नाही, विद्यार्थ्यांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये भीती व दहशत या आजारामुळे निर्माण झालेली आहे, परीक्षा देण्यासाठी जी मानसिकता हवी ती त्यांची रहालेली नाही, परंतु सदर संबंधित अधिकाऱ्याच्या अट्टाहासामुळे ही परीक्षा नियोजित वेळेमध्ये ते पार पाडणार आहे ,परंतु प्रशिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यात येत आहे , यातील काही कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करून कार्यालयात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले , या गोंधळामध्ये ही परीक्षा घेण्यात येत आहे , कर्मचाऱ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळहि देण्यात आला नाही आणि आताचे, परीक्षेसाठी अनुकूल वातावरण नाही चांगले निर्माण झाल्यास परीक्षा घेण्यात यावा जेणे करून कुणाच्याही जिवित्वास धोका राहणार नाही

Copyright ©