यवतमाळ सामाजिक

कचऱ्या मुळे आग लागून टेलरिंगचे दुकान जळून खाक

 

दिग्रस शहरातील कचरा वैवस्थापन कुचकामी

शहरातील मध्यवस्तीत तपस्वी घंटी बाबा मंदिरा च्या मागील बाजूस लागून असलेल्या टीन पत्र्यांच्या टेलरिंगच्या दुकानाला आग लागून दुकानातील साहित्य व कापड जळून खाक झाले. ही घटना आज सकाळी साडे आठ ते नऊच्या सुमारास नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनि आग विझविण्यासाठी खूप पर्यंत केलेत मात्र आग आत मध्ये लागून असल्याने आटोक्यात येत नव्हती.टेलरिंग दुकांन मालकाला फोन करून बोलावण्यात आले जेव्हा दुकान चे टाळे खोलुन झडपी हटवताच आगीने रुद्र रूप घेतले होते व आत मधील सर्व कपडे ,काउन्टर , 3 शिलाई मशीन,पंखा,व इतर साहित्य जळून खाक झाले होते.न.प.चे कर्तव्य दक्ष अधिकारी इरफान खान यांना फोनकरून सूचना देण्यात येताच त्यांनी अग्निशमन ला तात्काळ घटनास्थळी पाठविले मात्र तोवर नागरिकांनि आगीवर नियंत्रण मिळविले होते.ही आ दुकानाच्या बाजू असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे लागल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे,येथील कचरा व्यवस्थापन होत नसल्याने नेहमी येथे कचरा पडून राहतो.स्थानिक नागरिकांनी न.प.ला वेळोवेळी तक्रारी करून सुध्दा येथील कचरा उचलण्यात येत नसल्याचे नागरिकांची तक्रार आहे.दुकानाला लागलेल्या आगीत अंदाजे एक ते दीड लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे

Copyright ©