यवतमाळ सामाजिक

जिल्ह्यात 241 जण पॉझेटिव्ह, 154 जण कोरोनामुक्त तिघांचा मृत्यु

जिल्ह्यातील इतर महत्व पूर्ण घडामोडी

यवतमाळ, दि. 26 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 241 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 154 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 60 वर्षीय व 82 वर्षीय पुरुष तर मानोरा (जि.वाशिम) येथील 81 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 241 जणांमध्ये 141 पुरुष आणि 100 महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ येथील 113 रुग्ण, दिग्रस येथील 44, पुसद येथील 38, घाटंजी येथील 9, नेर येथील 7, पांढरकवडा येथील 6, दारव्हा येथील 6, उमरखेड, वणी आणि झरी जामणी येथील प्रत्येकी 5, आर्णि, कळंब आणि महागाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.

शुक्रवारी एकूण 1374 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 241 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1133 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1427 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 17097 झाली आहे. 24 तासात 154 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 15213 आहे. तर जिल्ह्यात एकूण 457 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 160041 नमुने पाठविले असून यापैकी 159324 प्राप्त तर 1717 अप्राप्त आहेत. तसेच 141227 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
______________________________
कोरोना प्रादुर्भावाबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला यंत्रणेचा आढावा

यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी यंत्रणेचा आढावा घेऊन कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.

पॉझेटिव्ह आलेल्या रुग्णांचे हाय रिस्क आणि लो रिस्क संपर्कातील सर्वांचा शोध घेऊन त्यांच्या नमुन्यांची तपासणी करावी, अशा सुचना देऊन जिल्हाधिकारी म्हणाले, रोज किती जणांचे नमुने घेण्यात आले, तपासणीकरीता किती पाठविले आदींची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिका-यांनी देणे बंधनकारक आहे. भांबराजा येथे एकाच गावात मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्यामुळे संपर्कातील नागरिकांचा शोध आणि नमुने तपासणी त्वरीत करावी. जेणेकरून प्रादुर्भावाला आळा घालण्यास मदत होईल. रॅपीड ॲन्टीजन किट प्रत्येक तालुक्याला किती मिळाल्या होत्या. त्यापैकी किती उपयोगात आल्या, शिल्लक किती आदी माहिती रोज अपडेट करावी. तसेच ॲन्टीजन किटबाबत डाटा एन्ट्री किती बाकी आहे, त्याबाबतसुध्दा प्रशासनाला नियमित अवगत करावे.

वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित गंभीर रुग्ण किती, व्हेंटीलेटरवर किती आहे, याबाबत अधिष्ठाता यांनी रोज माहिती द्यावी. तसेच गृह विलगीकरण व कोव्हीड केअर सेंटरची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी द्यावी. जिल्ह्यातील सर्व कोव्हीड केअर सेंटर आज संध्याकाळपर्यंत सुरू झाले पाहिजे, याबाबत गांभिर्याने लक्ष द्या. या सर्व केंद्रांवर पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक साधनसामुग्री आदींचा पुरवठा करा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

बैठकीला कोरोना नियंत्रक डॉ. गिरीश जतकर, मेडीसीन विभागाचे प्रमुख डा. बाबा येलके, डॉ. विविक गुजर यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

__________________________
गुणवत्तापूर्वक शिक्षण अभियानासाठी जिल्ह्यतील पाच शाळांची निवड

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत होणार अंमलबजावणी

यवतमाळ, दि. 26 : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्यावतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानांतर्गत राज्यात 100 आदर्श शाळांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील पाच शाळांची निवड करण्यात आली असून याबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शुक्रवारी आढावा घेतला.

निवड करण्यात आलेल्या शाळांमध्ये कळंब तालुक्यातील देवनाळा येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, पुसद तालुक्यातील धनसाळ येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळा, उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळा, यवतमाळ तालुक्यातील जांब आणि सावरगड येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळांचा समावेश आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानाची अंमलबजावणी करून भौतिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणासह आदर्श शाळांची निर्मिती अंतर्गत मुला –मुलींसाठी स्वतंत्र्य शौचालय, पिण्यासाठी शुध्द पाणी, हॅन्ड वॉश स्टेशन, बसण्यासाठी बेंचेस आदींचा समावेश राहील. तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर करणे. सर्व भागधारकांची प्रशिक्षणातून क्षमता बांधणी करणे. शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण अंतर्गत गावांमध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी लोकसहभागातून नाविण्यपूर्ण उपक्रम जसे गणिताचे गाव, इंग्रजीचे गाव, गाव तेथे वाचनालय यासारखे उपक्रम सुरु करणे. पर्यावरणस्नेही शाळा व आरोग्य आणि पोषण अंतर्गत शाळा तिथे परसबाग या उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांच्या आहारात विविधता निर्माण करून त्यांना सुदृढ करणे. तसेच शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड, स्वच्छता, जैवविविधतेविषयीचे उपक्रम राबविणे. आनंददायी शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या जीवन कौशल्याचा विकास करणे व व्यावसायिक शिक्षणाची ओळख होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आदींचा समावेश आहे.

राज्यस्तर ते शाळा स्तरापर्यंतचे प्रत्यक्ष नियोजन, अंमलबजावणी व मुल्यमापन विविध उपक्रम राबविण्यासाठी दिनांक 26 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान या अभियानात समाविष्ट उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आदर्श शाळा पुरस्कार वितरण समारंभ दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्ताने करण्यात येईल. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या भागधारकांना सन्मानित करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यातून कमाल 3 व किमान 2 शाळा आदर्श शाळा जिल्हास्तरावर निवडण्यात येतील. ही योजना महाराष्ट्र ग्राम सामाजि‍क परिवर्तन अभियानात समाविष्ट गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांसाठी राहणार आहे. शाळेची पटसंख्या 100 च्या पुढे असणे आवश्यक आहे. आदिवासी भागातील जिल्हा परिषदांच्या शाळांसाठी किमान 60 पटसंख्या निकष ठेवण्यात आला आहे.

सदर शाळेची इमारत निर्लेखन झालेली नसावी. शाळेला स्वत:ची जागा असावी. मिशन 100 आदर्श शाळा निर्मितीसाठी गावांमध्ये उत्स्फुर्त लोकसहभाग असणे आवश्यक आहे. त्यासाठी बिगर आदिवासी भागात येणाऱ्या शाळातील गावांनी 10 टक्के लोकसहभाग (5 टक्के लोकवाटा व 5 टक्के श्रमदान) देणे आवश्यक आहे. आदिवासी क्षेत्रातील गावांनी 2 टक्के लोकवाटा व 3 टक्के श्रमदान करणे अपेक्षित आहे. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत किंवा खाजगी संस्थेमार्फत प्राप्त होणाऱ्या निधीचा विनीयोग अत्यंत पारदर्शक पध्दतीने होण्यासाठी लोकसहभागाधारीत उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

यावेळी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विशाल जाधव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुर्यवंशी, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानच्या जिल्हा कार्यकारी अर्चना हिवराळे यांच्यासह संबंधित तालुक्यांचे ता

Copyright ©