यवतमाळ सामाजिक

जिल्ह्यात तीन मृत्यु, 140 जण पॉझेटिव्ह 90 जण कोरोनामुक्त

 

यवतमाळ, दि. 25 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 140 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 90 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष, पुसद येथील 65 वर्षीय महिला आणि मारेगाव तालुक्यातील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 140 जणांमध्ये 87 पुरुष आणि 53 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 45 रुग्ण, पुसद 32, दारव्हा 19, बाभुळगाव 14, महागाव 8, पांढरकवडा 6, वणी 5, दिग्रस 3, घाटंजी 3, कळंब 2, उमरखेड 2 आणि इतर ठिकाणचा 1 रुग्ण आहे.

गुरूवारी एकूण 1371 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 140 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1231 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1343 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 16856 झाली आहे. 24 तासात 90 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 15059 आहे. तर जिल्ह्यात एकूण 454 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 158453 नमुने पाठविले असून यापैकी 156950 प्राप्त तर 1503 अप्राप्त आहेत. तसेच 140094 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
_______________________

मार्च महिन्याचा लोकशाही दिन रद्द

यवतमाळ, दि. 25 : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याने सदर ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील महिन्यातील पहिला सोमवार, दिनांक 1 मार्च 2021 रोजी बळीराजा चेतना भवन, (बचत भवन) जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय लोकशाही दिन सभेचे आयोजन होणार नाही.

तथापी निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमेलद्वारे rdc_yavatmal@rediffmail.com वर अर्ज स्विकारून त्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. सबब अर्जदारांनी इमेल अर्ज सादर करावे, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

Copyright ©