यवतमाळ सामाजिक

दुचाकी चोरांचा धुमाकूळ , पोलीस बसले मुंग गिळून!

समता मैदान पोस्टल ग्राउंडवरुन आणखी एक दुचाकीची चोरी चोरी झालेल्या दुचाकीची संख्या 4 पेक्षा अधिक, चोट्यांना पोलिसांचे अभय, पालकमंत्रीचेही दुर्लक्ष यवतमाळ- येथील जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचे बाजुना असलेले समता मैदान पोस्टल ग्राउंडवरून एका युवकाची दुचाकी सोमवारच्या सायंकाळच्या सुमारास अज्ञात चोट्याने चोरून नेली. सततच्या होणा-या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. दुचाकी चोरट्यांना पकडण्यात यवतमाळ पोलीसांकडून कुठलीही ठोस कारवाई करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे झालेल्या नुकसानच्या धक्क्यातून सामान्य माणुस आतापर्यंत सावरलेला नाही. तोच पुन्हा लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे. अशा परिस्थतीत नागरिकांच्या दुचाकी चोरी जात असल्याने सामान्य नागरिक अधिकच चिंतीत आहे. नागरिकांना चिंतामुक्त ठेवण्याची जबाबदारी असलेले जिल्ह्याचे पालकमंत्रीचेही नागरिकांच्या समस्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांनीही येथे घेतलेल्या सभेत शहरातील नागरिकांच्या चोरी होत असलेल्या दुचाकी बाबत पोलिस प्रशासनाला जाब विचारला नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलही नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. पोस्टल ग्राउंडवर आपली दुचाकी सोडून नागरिक मोकळेपणाने आज फिरू शकत नाही. दुचाकी चोरटयांना पकडण्यात पोलिसांकडून कसलेही प्रयत्न होताना दिसत नाही, वरिष्ठ पोलिस अधिकिारींनी जातीने लक्ष घालून दुचाकी चोरट्यांना पकडण्याची मागणी यवतमाळकरांमधून होत आहे.

Copyright ©