यवतमाळ सामाजिक

सावरगाव येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य तथा शेतकऱ्याचा आगीत सापडला मृतदेह घातपात की आत्महत्या हे समजलेच नाही

 

घाटंजी :- तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावरगाव येथील गावालगतच असलेल्या शेतात दि 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याचे निदर्शनास आल्याने गावालगत असलेल्या शेतात गावकऱ्यांनी धाव घेऊन मोठ्या प्रमाणात एका महाकाय चिंचेच्या वृक्षाचे जलतण गेल्या दोन वर्षापासून पडले होते त्या(लाकडाची गंजी) जलतनाला अचानक आग लागल्याने गावकऱ्यांनी धाव घेऊन संबंधित आग ही शेजारी असलेल्या पिकाकडे जाऊ नये व पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून ती आग विझवत असताना त्या आगीत मधोमध एक मृतदेह दिसल्याने एकच खळबळ उडाली.

दि 22 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील सावरगाव येथील गावालगतच असलेल्या एका शेतात गेल्या दोन वर्षापासून असलेल्या चिंचेच्या लाकडाची गंजी अचानक पेटल्याने समस्त गावकऱ्यांनी ते आग विझवण्यात करिता आटोकाट प्रयत्न करीत होते त्याकरिता विविध मार्गाने त्यांनी आग विझविण्याचा व शेजारी असलेल्या पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक त्या मोठ्या प्रमाणात असलेल्या लाकडाच्या गंजीत एक मृतदेह आढळल्याने गावकऱ्यांनी संबंधित घटनेची माहिती पारवा पोलीस स्टेशनला दिली लगेच पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोरख चौधर व पोलीस उपनिरीक्षक टाले पोलीस कॉन्स्टेबल मुंडे, वाघमारे व इतर शिपाई घटनास्थळी हजर झाले संबंधित आग विझवून त्या आगीत राग झालेला मृतदेह कसाबसा गुंडाळून शवविच्छेदन करिता पाठविण्यात आले मात्र संबंधित जळालेला मृतदेह संपूर्णपणे खाक होऊन असल्यामुळे सदर शवविच्छेदन घाटंजी ला न करता यवतमाळ येथे करण्यात आले तर तेथे सुद्धा संबंधित शवविच्छेदनावर काही नातलगांचा आक्षेप असल्यामुळे उर्वरित मृतदेहाचा भाग हा नागपूर येथे शवविच्छेदन करिता पाठवण्यात आल्याची माहिती कळते तर सदर घटनेची फिर्याद वामन माधव चौधरी यांनी पारवा पोलिसात दिली असून अशोक भावराव चौधरी हे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वतःचे सरण रचून आत्महत्या केल्याची तक्रार पारवा पोलिसात देण्यात आली आहे तर मृतक अशोक भाऊराव चौधरी हे नुकतेच ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपक्ष निवडून आलेले आहे यांना पुढील अडीच वर्षात सरपंचपद देण्यात येईल असे ठरविण्यात आल्याची माहिती कळते आहे पुढील तपास ठाणेदार गोरख चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभाग करीत आहे.

—————————-

Copyright ©