Breaking News यवतमाळ सामाजिक

*घाटंजी येथे तहसील कार्यालय समोर राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंतीदिन साजरा..!!*

 

 

“गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला”

कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी संपूर्ण देशात शिक्षण व स्वच्छतेची महती आपल्या भजन व कीर्तनाच्या माध्यमातून गाव खेड्यात जाऊन लोकांच्या मनातील घाण दूर करून समाज परिवर्तनाचे कार्य करणारे थोर समाजसुधारक कर्मयोगी गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन प्रफुल राऊत यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुणबी समाज संघटनेचे ता.अध्यक्ष मोरेश्वर भाऊ वातीले यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम घेण्यात आला प्रमुख उपस्थिती संजय गोडे, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुरेशभाऊ कुडेगावे,भारत मुक्ती मोर्चाचे ता.संघटक प्रकाश वावरे, नगर परिषदेचे आरोग्य सभापती अनिल खोडे, सामाजिक कार्यकर्ते,प्रफुल राऊत,गजानन मडावी सर, पांडूरंग निकोडे,अजय गजभिये,हरिभाऊ पेंदोर,अमोल बाहेकर,देशमुख काका, सह समस्त मान्यवर उपस्थित होते,कार्यक्रमाचे प्रास्तविक धनंजय किनाके यांनी केले,तर सूत्रसंचालन भाविक भगत यांनी केलं ,कार्यक्रमाच्या निमित्याने उपस्थित मान्यवरांनी वैचारिक पद्धतीने संतांच्या विचारांवर कश्या पद्धतीने मार्गक्रमण करायला हवं असे मत व्यक्त केल कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून शेतकरी नेते मोरेश्वर भाऊ वातीले यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकत ज्या संतांनी समाजपरीवर्तनाचे कार्य केले त्या संतांना जातीपातीमध्ये वाटून घेण्यापेक्षा त्यांचं विचार आत्मसात करण्याची गरज आहे,असे मत कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केले,कार्यक्रमाचे आभार प्रशांत धांदे यांनी केलं कार्यक्रमाला सर्वच पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Copyright ©