Breaking News यवतमाळ सामाजिक

*युवकाची विष प्राशन करून आत्महत्या*_______ (पैनगंगेच्या पात्रात मृतदेह आला आढळुन)

 

 

महागांव :

युवकाने विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना काल २१ फेब्रुवारी (रविवारी ) सकाळी तालुक्यातील कवठा येथे उघडकीस आली आहे.

महागांव तालुक्यातील कवठा येथील संदिप प्रकाश भारती (वय वर्षे २२) या युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल सकाळी उघडकीस आली आहे. संदीप हा २० फेब्रुवारीला रात्री घरून बाहेर गेला होता परंतु तो सकाळ पर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता सकाळी २१ फेब्रुवारी (रविवारी) गावालगत असलेल्या पैनगंगा नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह आढळुन आला व त्याच्या शेजारी किटकनाशकाचा डब्बा आढळुन आल्याने त्याने विष प्राशन केले असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती पोलीस पाटील दिनेश भारती यांनी महागांव पोलीस स्टेशनला दिल्यानंतर महागांव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवना ग्रामीण रुग्णालयात पाठविला. संदीपच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजु शकले नाही.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©