यवतमाळ सामाजिक

*नगरपरिषद संकुलात रुग्णालास अचानक लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान*

यवतमाळच्या मध्येवस्तीतील भाजी मार्केट लगत दत्त चौक येथील रुग्णालय असून या रुग्णालयात अचानक आग लागल्यामुळे या ठिकाणी आयुष्य इलेक्ट्रो होमिओपॅथी सेंटरमधील अनेक मशीन उपचारास ठेवण्यात आल्या होत्या यात असलेल्या अनेक मशनरी जळून खाक झाल्याची घटना आज दोन वाजताच्या दरम्यान घडली डॉक्टर ममता बैस यांचे हे रुग्णालय असून या रुग्णालयात आयुष इलेक्ट्रो होमिओ सेंटर चालवत होत्या त्या ठिकाणी जिम मशनरी – व रुग्णालयाचे मूळ कागदपत्र या लागलेल्या आगीत जळून खाक झाले प्राथमिक अंदाजावरून जवळपास दहा ते 15 लाखाचे नुकसान झाले आहे यावेळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी दोन तासात आग आटोक्यात आणली

Copyright ©