यवतमाळ राजकीय

विठ्ठलवाडी ग्रामपंचायत च्या सरपंच पदी व उपसरपंच पदी शिला कुंभेकर इंदूबाई बोन्द्रे यांची बिनविरोध निवड

 

तालुक्यातील विठ्ठलवाडी ग्रामपंचायत च्या सरपंच पदी शिला मनिराम कुंभेकर तर उपसरपंच पदी इंदूबाई निरंजन बोन्द्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यवतमाळ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका १५जानेवारीला संपन्न झाल्या असून २२ फेब्रुवारी ला विठ्ठलवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उपसरपंच निवडीसाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलावण्यात आली. यात सरपंच पदासाठी शिला मनिराम कुंभेकर तर उपसरपंच पदासाठी इंदूबाई निरंजन बोन्द्रे यांचा प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध होऊन निवड करण्यात आली. स्वराज्य ग्राम विकास पॅनलने सात पैकी पाच जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला होता. २२ तारखेला झालेल्या सरपंच उपसरपंच या निवडणुकीत सरपंचपदी शिला मनिराम कुंभेकर उपसरपंचपदी इंदूबाई निरंजन बोन्द्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी सभेला सदस्य गण नानीबाई रामभाऊ बान्ते,गीता राजू फुलूके, देविदास चिंधुजी मते,उपस्थित होते.निवडणूक अध्याशी अधिकारी म्हणून एस. एस.नक्षणे यांनी काम पाहिले निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी प्रविण बान्ते,नरेश मते, अशोक बोन्द्रे, प्रमोद फ्रेंडर, शंकर भाकरे, रवींद्र तोंडरे, रवी डेबूर, निखील बोन्द्रे, राजेंद्र फुलूके इत्यादी मोलाचे सहकार्य केले

Copyright ©