यवतमाळ सामाजिक

*शिवजयंतीच्या पावन पर्वावर तहसीलदार राजेश वझीरे यांनी घेतली कोरोनाची प्रथम लस*

 

 

 

अधिकारी-कर्मचारी आणि जनतेला लस घेण्याचे केले आव्हान

 

दिग्रस

 

दिग्रस तालुक्यात 16 जानेवारीपासून covid-19 लसीकरण मोहीम सुरू झाले असून किरोना काळात फ्रन्टलाइन वर प्रशासकीय अधिकारी वैद्यकीय कर्मचारी नगर परिषद कर्मचारी सफाई कामगार पोलिस कर्मचारी पत्रकार यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या राष्ट्रीय संकटाला सामोरे जाऊन काम केले आहे अनेक अडचणी ला सुद्धा सामोरे जायचे काम पडले कोरोना लस येईपर्यंत चिंता होती म्हणून भारताने या लसीची सुरुवात केली असून दिग्रस तालुक्यात सुद्धा लसीकरण मोहीम सुरू झाली आहे म्हणूनच दिग्रस चे कर्तव्यदक्ष तहसीलदार राजेश वजीरे मुख्याधिकारी शेषराव टाले आणि इतर कर्मचाऱ्यांनी शिव जयंतीच्या पर्वावर स्वतः प्रथम covid-19 ची लस घेतली आहे या यांच्या पुढाकारामुळे सर्व अधिकारी प्रशासकीय कर्मचारी जनता ही उत्साहित झाली असून लस घेण्यासाठी पुढे येतील हे मात्र निश्चित सोबतच तहसीलदार राजेश वझीरे यांनी या लसीबाबत गैरसमज करून न घेता स्वतःहून पुढे येऊन लस घेऊन स्वतःला सुरक्षित करावे असे आवाहन देखील केले आहे

Copyright ©