यवतमाळ सामाजिक

बस स्थानक चौक, घाटंजी येथे शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

घाटंजी – बस स्थानक चौक येथे शिवाजी महाराज जयंती विश्वरूप फाऊंडेशन कार्यकर्त्यांनी साजरी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी सामाजिक अंतर ठेवून कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व नियमाचे पालन करून जयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० ला झाला.शिवजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरचा आदिलशाही विरुद्ध आणि मोघल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करुन मराठा स्वराज्य स्थापन केले.राजगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स.१६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल नगराळे यांनी वेक्त केले. कार्यक्रमाचा वेळी बस स्थानक प्रमुख श्री.लांजेवार साहेब आयोजक रमाई जयंती सुरेश जाधव यांची हजेरी होती. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विजय गजबे हे होते. या कार्यक्रमाचे आयोजन – संजय घुसे मोहन पेटेवार यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीते करिता संतोष ओंकार,शुभम नगराळे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन जितेंद्र मूनेश्वर यांनी तर आभार प्रदर्शन सुजल भालेराव यांनी केले.

Copyright ©