Breaking News यवतमाळ सामाजिक

जिल्ह्यात दोन मृत्युसह 126 जण पॉझेटिव्ह * 68 कोरोनामुक्त

 

 

यवतमाळ, दि. 19 :

गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह 126 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. यात 88 पुरुष आणि 38 महिलांचा समावेश आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 68 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिमध्ये यवतमाळ येथील 87 वर्षीय आणि दारव्हा तालुक्यातील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या 126 जणांमध्ये यवतमाळातील 59 रुग्ण, पुसद येथील 36, दारव्हा 19, पांढरकवडा 6, घाटंजी 3, बाभूळगाव 2 आणि झरीजामणी येथील 1 रुग्ण आहे.

 

शुक्रवारी एकूण 518 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 126 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 392 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 867 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 15825 झाली आहे. 24 तासात 68 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14514 आहे. तर जिल्ह्यात एकूण 444 मृत्युची नोंद आहे.

 

सुरवातीपासून आतापर्यंत 150295 नमुने पाठविले असून यापैकी 149923 प्राप्त तर 372 अप्राप्त आहेत. तसेच 134098 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी शासन आणि प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. नियमितपणे मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, वारंवार हात स्वच्छ धुणे, गर्दीत जाणे टाळणे आदी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

Copyright ©