यवतमाळ राजकीय

*येळाबारा ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी अंजना मेश्राम*  ————————————-  *उपसरपंच पदी माया इंगोले* 

 

 

घाटंजी(तालुका प्रतिनिधी)

नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूकित येळाबारा ग्राम विकास आघाडीला बहुमत मिळाले होते. यात दिनांक १८ ला झालेल्या निवडीत सरपंच पदी अंजना मेश्राम तर उपसरपंच पदी माया इंगोले यांची निवड झाली असून येळाबारा ग्राम पंचायती चे नेतृत्व महिला कडे असल्याने येथे महिला राज निर्माण झाले आहे.

येथिल जनतेने ग्राम विकास आघाडीला भरभरून कौल दिल्याने त्यांचाच सरपंच निवड होणार हे निश्चित होते केवळ औपचारिकता बाकी होती ती १८ तारखेला पूर्ण झाली. यासाठी अविभाऊ ठाकरे, दिलीप जगताप, मिलिंद कवाडे, परक्षित इंगोले, विनोद रामगडे, माणिक पायताडे, विलास मडावी, उमेश मानकर, माणिक मडावी, लक्ष्मण पांगुळ, रामा पांगुळ, गणेश पेंदोर, नामदेव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात ग्राम विकास आघाडीची रणनीती आखण्यात आली होती. त्याप्रणे या आघाडीला यश प्राप्त झाल्याचे बोलल्या जात आहे.

गावाचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी ग्राम विकास आघाडीची गरज समजून सचिन वीरदंडे, शामा रामगडे, प्रभुदास आत्राम, सोमनाथ कुमरे, प्रविण भोयर, अतुल नगरकर, लक्ष्मण उइके, उमेश मांढरे, विपीन कवाडे, दिलीप भोयर, गजानन कोकाडे, लक्ष्मण इंगोले, निकेश मानकर, दिपक पतलबंशी, मोरेश्वर बारहाते, अतिश वैद्य, प्रदीप दरणे, अखिल पायताडे, देविदास जगताप, हिम्मत हुळगुद्दे, आकाश मंजुळकर, कृष्णा आत्राम, सागर खडसे, पुंडलिक इंगोले, अनिल मानकर, अनिल वैद्य, कैलास पाईकराव, बाळकृष्ण साठे व विनोद गाडेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

जनतेनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता प्रथम विकास कामाला प्राधान्य देवु असे मनोदय नवनिर्वाचित सरपंचा मेश्राम व उपसरपंचा इंगोले यांनी व्यक्त केला असून या निवडीत ग्राम विकास आघाडी च्या सर्व शिलेदारांचे आभार मानले.

Copyright ©